शिरूर
सरंक्षण खात्याविषयी प्रश्न विचारत स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढर करणारी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांची मोडस खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) कोपरा सभेत जाहीर पणे मांडली. मी बोलतो तर पुराव्यानिशीच बोलतो, अस म्हणत हा फक्त ट्रेलर आहे, शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्यायची तयारी करा, अस प्रतिआव्हान पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिलय.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. कोल्हे हे गुरुवारी सातारा दौरा करुन आज पुन्हा आपल्या मतदारसंघात गावभेट करत कोपरासभा घेत आहेत. यावेळी त्यांच्या सोबत आमदार अशोक पवार, स्वप्नील गायकवाड, पोपट शेलार, विद्या भुजबळ, विश्वास ढमढेरे, संभाजी फराटे, दत्तात्रय फराटे, शंकर फराटे, सुभाष कळसकर, संजय देशमुख, जीवन तांबे, शरद निंबाळकर, राहुल करपे, गोरक्ष गदाडे, मच्छिन्द्र गदादे यासह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अमोल कोल्हे म्हणाले की, ज्यांनी 15 वर्षे ज्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं. ते जेव्हा सांगतात की मी हजार ते अकराशे प्रश्न विचारले. त्यातले 60 ते 70 प्रश्न असे आहेत, की ज्या संरक्षण खात्याला, रेल्वेला त्यांची कंपनी काहीना काही गोष्टी सप्लाय करते.
अमोल कोल्हे म्हणाले की, हे प्रश्न असे आहेत की, संरक्षण खात्यात, रेल्वेत ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या केव्हा खरेदी केल्या जाणार कोणाकडून खरेदी केल्या जाणार. या खरेदीचा नेमका टप्पा काय आहे. असे प्रश्न जर लोकसभेचा सदस्य विचारत असेल तर असे प्रश्न विचारून परदेशातील स्वतःच्या कंपनीच उखळ पांढर करुन घेणारा लोकप्रतिनिधी असेल तर त्याला लोकप्रतिनिधी म्हणायचं की लोकप्रतिनिधीच्या वेषातला व्यापारी म्हणायचं हे विचारणं गरजेचं आहे असेही डॉ. कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे म्हणाले की, त्यांना पुराव्यानिशी दाखवतो, काय पुरावा आहे, हे आत्ता सांगितलं असं म्हणत डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, त्यांनी आता आव्हान दिल आहे, शब्दाला माणूस पक्का असेल माघारी घेण्याची तयारी करावी. गेली पाच वर्षे मी संसदेत बोलताना, पुराव्यानिशी कधी बोललो नाही, असे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले की, मी कधीच कोणाच्या व्यवसायावर बोलत नाही. पण सातत्याने जेव्हा नटसम्राट, नौटंकी, यासह खालच्या पातळीवरची भाषा केली जाते, तेव्हा मला प्रश्न पडत होता. मतदार संघात दाखवायचं मी तुमच्यासाठी काम करतोय, आणि दिल्लीत जाऊन स्वतःच्या कंपनीच उखळ पांढर करायचं हा अनुभव घेतला, अस म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला.