अयोध्येत राम मंदिर (Ram temple) बांधण्यासाठी तुम्ही मोदीजींना दुसऱ्यांदा निवडून दिलं. मात्र, काँग्रेसने (Congress) राम मंदिर रोखलं आणि आज उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. ठाकरेंची शिवसेना खरी असेल तर त्यांनी मुंबईत सभा घेऊन सांगावं की, अयोध्येत राम मंदिर झालं ते चांगलं झालं. पण ते सांगणार नाहीत. कारण, आता त्यांची व्होट बॅंक ही कॉंग्रेसची व्होट बॅंक आहे, ठाकरे हे नकली सेनेचे अध्यक्ष आहेत, अशा शब्दात शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.’ रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज अमित शाह यांची सभा झाली.
सुनेत्रा पवारांना 11 सरपंचांचा पाठिंबा
या सभेला उदय सामंत, दिपक केसरकर, आमदार नितेश राणे, शेखर निकम, चित्रा वाघ, निलेश राणे, किरण सावंत, सदानंद चव्हाण, शिल्पा पटवर्धन आदी नेते उपस्थित होते. या सभेला संबोधित करतांना शाह म्हणाले, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असून उद्धव ठाकरे हे नकली सेनेचे अध्यक्ष आहेत. आज नकली सेनेचे अध्यक्ष आपल्या भाषणात वीर सावरकरांचं नाव घेऊ शकत नाही. सावरकरांचं नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. त्यांच्यात सावरकराचं नाव घ्यायची हिंमत नाही. कारण ते नकली सेनेचे अध्यक्ष आहेत, अशी टीका शाह यांनी केली.
मतदारांना मेट्रोची खास सवलत मतदानादिवशी तिकीटांवर 10 टक्के सूट
पुढं ते म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. आणि याच कॉंग्रेसने कायम कलम 370 ला विरोध केला. जे मुख्यमंत्रीपदासाठी शदर पवार आणि राहुल गांधींना शरण जातात, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकत नाहीत, असंही शाह म्हणाले. मुंबईत सभा घेऊन उद्धव ठाकरेंनी सांगावं की, अयोध्येत राम मंदिर झालं ते चांगलं झालं. पण ते सांगणार नाहीत. कारण, तुम्ही त्यांची व्होट बॅंक नाही आहात. त्यांची व्होट बॅंक ही कॉंग्रेसची व्होट बॅंक आहे, असंही शाह म्हणाले. यावेळी बोलतांना त्यांनी कॉंग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, दहा वर्षाआधी देशात सोनिया-मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. कॉंग्रेसच्या काळात पाकिस्तान दहशतवादी भारतात येऊन बॉम्बस्फोट करायचे. मात्र, मौनीबाब मौन लावून असायचे. कारण त्यांना व्होट बॅंकेची चिंता होती, अशी टीका त्यांनी मनमोहन सिंग यांच्यावर केली.