21 C
New York

Amethi : राहुल गांधी अमेठीतून नाही ‘या’ मतदारसंघातून लढणार

Published:

नवी दिल्ली : केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले राहुल गांधी (Rahul Gandhi) उत्तर प्रदेशमधील अमेठीतून (Amethi) ही निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, कॉँग्रेसने अमेठीतून दूसरा उमेदवार दिला आहे. तर राहुल गांधी ही आता रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. रायबरेलीतून (Raybareili) प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) निवडणूक लढवतील, असे आधी सांगण्यात येत होते, पण राहुल गांधी रायबरेलीतून लढणार असल्याने प्रियंका गांधी निवडणूक लढणार का, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Amethi अमेठीतून किशोर लाल शर्मा

कॉँग्रेसने शुक्रवारी सकाळी दोन उमेदवारांची यादी जाहीर केली. यात रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठीतून किशोर लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत असल्याने राहुल गांधी आणि किशोर शर्मा शुक्रवारी दुपारी अर्ज भरणार आहेत. अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शनासाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. प्रियंका गांधी या राहुल गांधींचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपच्या स्मृति इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. पण, राहुल यांनी केरळच्या वायनाड येथूनही निवडणूक लढवल्याने त्यांचा लोकसभेतील प्रवेश निश्चित झाला होता. यावेळी स्मृति इराणी पुनः अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधीदेखील अमेठीतूनच लढतील, असे बोलले जात होते. पण, कॉँग्रेसने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निर्णय बदलत राहुल यांना रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून रंगला राजकीय वाद… भाजप विरुद्ध आदित्य ठाकरे! नेमकं प्रकरण काय?

Amethi … म्हणून रायबरेलीची निवड

अमेठी आणि रायबरेली ही दोन्ही मतदारसंघ कॉँग्रेसचे बालेकिल्ले होते. पण, गेल्या दोन निवडणुकांमध्ये अमेठीतून भाजपच्या स्मृति इराणी निवडून येत आहेत. तिथे भाजपला जवळपास ४९ टक्के मते मिळाली आहेत. रायबरेलीत मात्र कॉँग्रेसला ४५ टक्केपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जात आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायबरेलीतील उमेदवारीवरून लक्ष्य बनवले आहे. मोदी यांनी राहुल यांना ‘ डरो मत’ असे म्हणत टोला लगावला आहे. प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढण्याचे ताळल्यावरूनही भाजपने टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img