‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत जोरदार चर्चेत आले आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अभिजीत उतरले आहेत. ते सातारा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता, अभिजीत बिचुकले कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदार संघामध्ये निवडणूक लढणार आहेत. आज ते आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे (Shrikanth Shinde) कल्याण लोकसभा मतदारसंघाकडून निवडणूक लढणार आहेत. अशातच आता कल्याण मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकले विरुद्ध श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. अभिजीत बिचुकले यांनी अर्ज भरण्यापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्या हल्लाबोल केला आहे.
http://अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून रंगला राजकीय वाद… भाजप विरुद्ध आदित्य ठाकरे! नेमकं प्रकरण काय?
संपूर्ण राज्याचे लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघावर आहे. कारण मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून दोन वेळा मोठ्या विजयाने जिंकून आले आहे. या मतदारसंघातुन आता अभिजीत बिचुकले उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. अभिजीत बिचूकले यांनी याआधी सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
अभिजीत बिचुकले यांनी श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला आहे, ते म्हणाले, ‘मी कोणत्याही पक्षात काम करत नाही. हा लोकसभा मतदारसंघ निवडण्यामागचे कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे साताऱ्याचे आहेत. रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. खूप कौतुक वाटते मला. पण ज्यापद्धतीने त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं आणि ज्या पद्धतीने ते आता राजकारण करत आहेत. तर ते जनतेला फसवत आहेत असे माझे ठाम मत आहे.’ हे संपूर्ण सरकार लोकांना फसवत असल्याची वार्ता बिचूकलेंनी केली.
भारती सिंग रुग्णालयात दाखल! तिला अश्रू झाले अनावर… http://भारती सिंग रुग्णालयात दाखल! तिला अश्रू झाले अनावर…