‘झपाटलेला ३’ (Zapatlela 3) या चित्रपटाबदल बरेच दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. सिनेसृष्टी आपला ठसा उमटवणारा चित्रपट ‘झपाटलेला’ चा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारी (Mahesh Kothari) यांनी चित्रपटाची घोषणा केली. मात्र यात नवा ट्विस्ट आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या साह्याने दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) दिसण्याची शक्यता आहे.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई केली होती
१९९३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘ झपाटलेला’. या चित्रपटात महेश कोठारे यांनी साकारलेल्या इन्स्पेक्टर महेश जाधवची धमाकेदार भूमिका, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रविंद्र यांची धमाल कॉमेडी आणि त्याचसोबत बाहुल्यात असलेला खलनायक तात्या विंचू यांनी सिनेरसिकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई केली होती. आजही या चित्रपटाची धुरा कायम आहे. यानंतर जवळपास 20 वर्षानंतर 2013 मध्ये ‘झपाटलेला 2’ रिलीज झाला. यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलाच्या भूमिकेत आदिनाथ कोठारी दिसला. तर, तात्या विंचू पुन्हा जिवंत झाला असल्याचे दाखवण्यात आले. मात्र आता नव्या ट्विस्ट आणि ‘3 डी’ तंत्रज्ञान वापरून ‘झपाटलेला ३’ ची निर्मिती होणार असल्याची माहिती आहे.
हा चित्रपट हॉरर-कॉमेडी जॉनर असून, प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय. या तिसऱ्या भागात लक्ष्मीकांत बेर्डेदेखील दिसणार आहेत. आर्टिफिशयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे पडद्यावर दिसणार असल्याची माहिती आहे. एका मुलाखतीत निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारी यांनी याबाबत माहिती दिली. लक्ष्मीकांत बेर्डेचे पात्र पुन्हा पडद्यावर आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दिलीप प्रभावळकर यांनी तात्या विंचू या खलनायक बाहुल्याला आवाज दिल्याने हा चित्रपट वेगळ्याच उंचीवर जाऊन पोचला. आता ‘झपाटलेला 3’ हा भाग तांत्रिकदृष्ट्या अधिक सुपरहिट करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर रिलीझ होईल अशी शक्यता वर्तवली आहे.
क्रांती रेडकरने जुळ्या मुलींच्या टोपण नावामागची सांगितली रंजक कहाणी