-1.4 C
New York

Viral Video : जिममध्ये व्यायाम करत असताना तरुणाने गमावला जीव

Published:

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. Viral Video जिममध्ये व्यायाम करणाऱ्या एका व्यक्तीचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू झालाय. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी चिंता व्यक्त केली असून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लशीचा हा दुष्णरिणाम असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरु झाली आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना व्यक्ती अचानक कोसळला आहे. व्हिडिओमध्ये ही धक्कादायक घटना कैद झाली आहे.

दीपक गुप्ता (३२) हा फिटनेस फ्रीक असल्याचे सांगण्यात येत आहे. दीपकचा भाऊ दिलीप यांनी सांगितले की, दररोजप्रमाणे मंगळवारीही दीपक ७ वाजता उठला आणि मुलाला शाळेत सोडल्यानंतर जिममध्ये गेला. 10 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मुलाला घेऊन गेले नाहीत. आम्ही दवाखान्यात पोहोचलो पण खूप उशीर झाला होता. येथे डॉक्टरांनी दीपकला मृत घोषित केले. दीपकला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.गेल्या १० वर्षांपासून तो जिम करत होता. वाराणसीमधील ही पहिली घटना नाही. याआधी सागळा परिसरातही जिममध्ये व्यायाम करताना एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तर 13 मार्च रोजी ढाब्यावर जेवताना एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, व्यक्ती एका बँचवर बसला आहे. डोकं दुखत असल्याचं तो सहकार्यांना सांगतो. डोक्याला हात लावून तो बसलेला असतो. अचानक तो जमिनीवर कोसळतो. जिममध्ये असलेले लोक जमिनीवर पडलेल्या व्यक्तीकडे धाव घेतात. व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सदर घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

Viral Video लोकांनी कोविशिल्डवर व्यक्त केली शंका

देशात तरुणामध्ये हर्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या महामारीनंतर देशात यात वाढ झाल्याचा लोकांचा दावा आहे. लोक या घटनेला कोरोना काळात घेतलेल्या प्रतिबंधात्मक लशीची जोडून पाहात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांमध्ये देखील हर्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेची भावना आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img