3.2 C
New York

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी दिली होती मला मुख्यमंत्री पदाची ऑफर, फडणवीसांचा गौप्यस्फोट

Published:

राज्यातील सत्तांतर आणि एकनाथ शिंदेंनी केलेली बंडखोरी अजूनही चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत फूट पडली. या बंडानंर मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती. तुम्ही मुख्यमंत्री बना असा फोन उद्धव ठाकरेंनी केला होता असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका (Devendra Fadnavis) मुलाखतीत केला. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. तुम्ही मुख्यमंत्री बना असे सांगत त्यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आम्ही ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत हे स्पष्ट झाले त्यानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. त्यांनी मला त्यावेळी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती.

तुम्ही त्यांना कशाला सोबत घेता किंवा एखादे पद देता त्यापेक्षा मीच सगळा पक्ष घेऊन येतो तुम्ही मुख्यमंत्री बना. सगळं नीट होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण, मी त्यांना म्हणालो आता वेळ निघून गेली आहे. माझ्या पातळीवर हा विषय संपला आहे. हवं तर तुम्ही वरिष्ठांशी चर्चा करू शकता असे मी म्हणालो. पुढे त्यांनी आमच्या वरिष्ठांशी चर्चा केली की नाही याची कल्पना मला नाही. हा फोन मिलींद नार्वेकर यांनी लावून दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले असे फडणवीस या मुलाखतीत म्हणाले. जे माझ्यासोबत आले त्यांच्याशी मी बेईमानी करणार नाही. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी वरिष्ठांशी चर्चा केली होती का याची मला माहिती नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

Devendra Fadnavis एकनाथ शिंदेंचा दावा काय ?

सूरतला जात असताना वसईजवळ असताना उद्धव ठाकरेंना फोन केला होता. उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली पण मी ती नाकारली. आम्हाला परत बोलवायचं आणि आमचे पुतळे जाळायच तसेच पक्षातून आमची हकालपट्टी करण्याचा त्यांचा प्लॅन होता. भाजप नेतृत्वाशी आम्ही फोनवरून चर्चा केली. आम्ही सूरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट दिल्लीला फोन केला होता. बंडखोरांऐवजी आम्हीच तुमच्यासोबत येतो अशी ऑफर त्यांनी भाजपला दिली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img