सध्या इंडियन प्रिमियम लिग म्हणजेच आयपीएलचे (IPL) सामने चालू आहेत. या सामन्यांत फलंदाज मैदानात धावांचा पाऊस पाडताना दिसतायत. जु्न्या, अनुभवी खेळाडूंपासून ते नव्या आणि तरुण खेळाडूंपर्यंत प्रत्येक खेळाडू आपापल्या टीमसाठी पूर्ण ताकदीने लढताना दिसतोय. दरम्यान, संपूर्ण भारत आयपीएलचे सामने पाहण्यात दंग असताना दुसरीकडे बीसीसीआयने आगामी टी-२० विश्वचषकासाठी (T-20 World Cup) भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात अनेक तरुण चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईच्या खराब कामगिरीमुळे कर्णधार हार्दिक पांड्या आधीच टीकेला सामोरे जात असून त्यात आता या यादीत रोहित शर्मा आणि शिवम दुबे यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.
जयंत पाटलांनी सांगितले ‘मविआ’चे भाकीत
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात, 3 खेळाडू यांनी खेळी खेळली ज्यांची T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यात पहिले नाव आहे ते म्हणजे शिवम दुबेचे, ज्याने IPL 2024 मध्ये 10 सामन्यात 350 धावा केल्या आहेत. चालू हंगामात तो 50 च्या सरासरीने धावा करत आहे, पण पंजाबविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसरे नाव आहे सीएसकेचा अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजा, ज्याला 4 चेंडूत केवळ 2 धावा करता आल्या. या संपूर्ण मोसमात 159 धावा करण्याव्यतिरिक्त जडेजा केवळ 5 विकेट घेऊ शकला आहे. CSK विरुद्ध PBKS सामन्यात फ्लॉप कामगिरी करणारा तिसरा खेळाडू अर्शदीप सिंग आहे, ज्याने 1 बळी घेतला परंतु 4 षटकात 52 धावा दिल्या.
T-20 World Cup मुंबईचे 3 खेळाडू ही फ्लॉप
गेल्या मंगळवारी, आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. LSG च्या एकाही खेळाडूला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही, पण MI च्या 4 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. कालच्या सामन्यात रोहित शर्मा फ्लॉप ठरला, त्याला 5 चेंडूत केवळ 4 धावा करता आल्या. रोहितला शेवटच्या 3 डावात केवळ 18 धावा करता आल्या. दुसरीकडे, हार्दिक पांड्याने लखनौविरुद्ध 2 विकेट घेतल्या, पण फलंदाजी करताना तो गोल्डन डकवर बाद झाला. त्याच्याशिवाय, जगातील नंबर-1 टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव कालच्या सामन्यात केवळ 10 धावा करून बाद झाला. विश्वचषक संघात निवड झाल्यानंतर या खेळाडूंची फ्लॉप कामगिरी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे.