लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. आता ठाकरे गटाने महिला अत्याचारासंदर्भात प्रसिध्द केलेल्या जाहिरातीवर भाजपने (BJP) आक्षेप घेतला. या जाहिरातीत पॉर्न फिल्म कलाकार घेतल्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. त्यावरून आता शिवसेना आणि भाजपच्या महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुपली आहे. वाघ यांच्या टीकेला आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Sushma Andhare चित्रा वाघ यांचं पॉर्न व्हिडीओचं ज्ञान अगाध
भाजपच्या आक्रस्ताळ्या बाईने काहीतर बोलण्याचा प्रयत्न केला. आधी तीर मारायचा अन् नंतर वर्तुळ करायचं, अशी त्यांची सवय आहे. आधी नितेश राणे यांनी असाच प्रयत्न केला होता, असा पलटवर अंधारे यांनी केला. आपल्याकडे पॉर्न इंडस्ट्री नाही, चित्राबाई पॉर्न फिल्म पाहत असतील, आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या. अर्धवट माहिती घेऊन बोलायचा प्रयत्न त्यांनी केला, असं म्हणत वाघ यांनी केलेल्या आरोपावर सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं. तसेच कोणत्याही राजकीय जाहिराती बनवत असतांना प्रॉडक्शन हाऊसकडून रेकॉर्ड चेक केलं जातं. या एॅपवर जाणारे प्रोग्राम सेन्सर केला जातो, भारत सरकारकडून सेन्सॉर होत असतात. माझ याचं ज्ञान कमी आहे, चित्रा वाघ यांचं पॉर्न व्हिडीओचं ज्ञान अगाध असावं किंवा त्या पारंगत असाव्यात, अशी टीका वाघ यांनी केला.
http://ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टार भाजपचा आरोप
Sushma Andhare चित्रा वाघ यांची टीका काय?
चित्रा वाघ यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ठाकरे गटाच्या जाहिरातातील पॉर्न स्टारचा वापर होत असल्याचा आरोप केला. ठाकरे गटाच्या ज्या काही जाहिराती येत आहेत. त्या ‘आदू’बाळ नाईट लाइफ प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आहेत. या जाहिरातीत वापरण्यात आलेले पात्र हे पॉर्नस्टार आहे. आणि या जाहिरातीत तोच विचारतो की, महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? आणि हा इसम अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतोय. या जाहिरातीमध्ये वडिलांच्या भूमिकेत असलेला व्यक्ती ‘उल्लू’ ॲपवरील वेब सीरिजमध्ये नको ते कृत्य करतोय. उद्धव ठाकरे या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणे पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल त्यांनी केला.
Sushma Andhare रेवण्णा फ्रान्समध्ये मजा मारतोय
जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला, ज्याने हजारो महिलांचं शोषण केलं, घरात काम करणाऱ्या महिलांनाही ज्यांनी सोडलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही याबाबत का विचारत नाहीत. मोदींनी प्रज्वल रेवण्णाच्या बाबतीत का विधान केलं नाही. 2500 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लीप समोर आले आहेत, जो भाजपासोबत येऊन ही लढाई लढत आहे, त्याच व्यक्तीकडून हे व्हिडिओ मिळाले आहेत. त्याला पळवून लावण्याचं काम तुम्ही केलंय, तो फ्रान्समध्ये मजा मारत फिरतोय आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात. जरा तरी लाज वाटू द्या, पाण्यात बुडून मरा… अशा तीव्र संतापजनक शब्दात प्रियंका चुतर्वेदी यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.