23.1 C
New York

Sanjay Raut: 11 दिवसांनी मतदानाचा टक्का वाढला कसा? संजय राऊत

Published:

सांगली

लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. देशात आतापर्यंत दोन टप्प्यात मतदान पार पडले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे. मात्र दुसऱ्या झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगासह (Election Commission of India) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडले. त्यावेळी जाहीर करण्यात आलेले मतदानाच्या टक्केवारी कमी झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता निवडणूक आहे जाहीर केलेल्या आकडेवारी मध्ये पाच टक्के पेक्षा अधिक वाढ झाली आहे. हे टक्केवारी कुठून वाढले असा सवाल संजय राऊत यांनी निवडणूक केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, भारताच्या निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा, हा एक गंभीर विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली निवडणूक यंत्रणा काम करत आहे. कुठलीतरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगावर दबाव टाकतेय. निवडणूक आयोगांने माती खाल्ली आहे. निवडणूक आयोग नरेंद्र मोदींच्या पगडीत गुदमरला असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएम यंत्रणा, आचार संहिता प्रकरण, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष फुटीवर दिलेल्या निर्णयानंतर आता एक गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे. काही भागात सहा ते सात टक्के मतदानात अचानक वाढ झाल्याचं समोर आले. हे खूप धक्कादाक असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img