21 C
New York

Salman Khan : ‘त्या’ आरोपीच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप

Published:

मुंबई

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या मुंबईतील बांद्रा येथील घरावर मागील महिन्यात गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीने बुधवारी मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील कोठडीत (Police Torture) गळफास लावून आत्महत्या (Accused Suicide) केली आहे. आरोपीच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) गंभीर आरोप केले आहे.

सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन असे त्या आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव होते. अनुजच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार अनुज याची कथितरित्या हत्या करण्यात आली आहे असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

अनुजच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांना अनेक आरोप केले आहेत. त्यानुसार, अनुजने आत्महत्या केली नाही, तर त्याची हत्या झाली आहे, असा आरोप त्याचा भाऊ अभिषेक थापन याने केला आहे. तसेच, आम्ही गरीब कुटुंबातील आहोत. माझा भाऊ ट्रकवर मदतनीस म्हणून काम करायचा. त्याने जेलमध्ये आत्महत्या केली नाही. त्याचा खून झाला आहे. त्याला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. 6-7 दिवसांपूर्वी मुंबई पोलिस त्याला संगरूर येथून घेऊन गेले आणि आजा आम्हाला फोन आला की त्याने आत्महत्या केली. तो असा नव्हता. पोलिसांनी त्याची हत्या केली असाही आरोप अनुजचा भाऊ अभिषेक याने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

सलमान खान प्रकरणातील आरोपी अनुजने मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील कोठडीत बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 12 वाजताच्या सुमारास आरोपींना दिलेल्या चादरीचा तुकडा फाडून तो शौचालयात गेला. तिथेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 1 वाजताच्या सुमारास इतर एका आरोपीने हा प्रकार पाहिला आणि त्याने आरडाओरडा करून पोलिसांना बोलावले. त्यानंतर थापनला तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img