आयपीएल जसे पुढे सरकत आहे तसतशी चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. १६ व्या हंगामातील ४९ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज काल पार पडला. पंजाब किंग्जने हा सामना 7 विकेटने जिंकला. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) 62 धावांच्या जोरावर चेन्नईने पंजाबला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले. पंजाबने हे आव्हान ३ विकेट्स गमावून पूर्ण केले. पंजाबचा हा मोसमातील चौथा विजय ठरला.
या सामन्यानंतर ऑरेंज कॅप कोणाकडे आहे?
एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. ऋतुराजने पंजाबविरुद्ध 129.17 च्या स्ट्राईक रेटने 48 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. ऋतुराजने या खेळीने 17 व्या मोसमात 500 धावांचा टप्पा पार केला. तसेच ऋतुराजने 500 धावा केल्या आणि 2 विक्रम ही आपल्या नावावर केले. एका मोसमात ५०० धावा करणारा ऋतुराज आयपीएल इतिहासातील पहिला कर्णधार ठरला. तसेच या मोसमात 500 धावांचा टप्पा गाठणारा ऋतुराज विराटनंतरचा दुसरा फलंदाज ठरला. ऋतुराजने विराटला 62 धावांच्या खेळीने मागे टाकत ऑरेंज कॅप जिंकली. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये 3 कर्णधार आहेत. यामध्ये ऋतुराज गायकवाड अव्वल स्थानावर आहेत. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल चौथ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर आहे. विराट कोहली दुसऱ्या तर साई सुदर्शन तिसऱ्या स्थानावर आहे. ऋतुराजच्या 62 धावांच्या खेळीने 10 सामन्यात एकूण 509 धावा केल्या आहेत. विराट आणि ऋतुराजमध्ये केवळ 9 धावांचे अंतर आहे. विराटने 10 सामन्यात 500 धावा केल्या आहेत. साई सुदर्शनच्या 10 सामन्यात 418 धावा आहेत. केएल राहुलने 10 सामन्यात 406 धावा केल्या आहेत. साई आणि केएलमध्ये केवळ 12 धावांचे अंतर आहे. ऋषभ पंतने 11 सामन्यात 398 धावा केल्या आहेत.