3.6 C
New York

Prasad Oak : प्रसाद ओकने सांगितला कोरोना काळातील सर्वात कठीण प्रसंग

Published:

मराठी चित्रपटसृ्ष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक म्हणून अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) ओळखला जातो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मालिकेत तो सध्या परीक्षक म्हणून दिसत आहेत. एका युट्यूब चॅनेलला प्रसादने नुकताच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आयुष्यातील कठीण काळाविषयी सांगितले आहे. दमणला तो हास्यजत्रा कार्यक्रमाचे शुटिंग करत होता. करोना काळ असल्यामुळे तिकडे चित्रीकरण सुरु होते. पण त्याच काळात त्याच्या वडिलांचे निधन झाले. प्रसादला वडिलांचे शेवटचे दर्शन देखील झाले नाही.

Prasad Oak बायो-बबलमध्ये चित्रीकरण करण्याची परवानगी

प्रसाद म्हणाला की, “ त्यावेळी कोरोनाची पहिली लाट येऊन गेली होती. आपण सगळेच भयानक भीतीमध्ये जगत होतो. सरकारकडून कोरोनाची झळ कमी झाल्यानंतर बायो-बबलमध्ये चित्रीकरण करण्याची परवानगी मिळाली. पण त्यासाठी मुंबईबाहेर जाणं फार गरजेचे होते. अशा पद्धतीने या कामाचे नियम सरकारने बनवले होते. आम्ही हे नियम पाळत महाराष्ट्राची हास्यजत्राचे पूर्ण मोठं युनिट मुंबई सोडून दमणला शूटींगसाठी गेलो.”

Prasad Oak फ्रेश झाल्यानंतर बघितलं तर बायकोचे १० मिस्डकॉल

“दमणमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हास्यजत्रेचा सेट बांधला होता. तिथेच आम्ही चित्रीकरण करणार होता. २९ एप्रिलला आम्ही दमणमध्ये पोहोचलो. सगळे सेटल झालो आणि ३० एप्रिलला तिथल्या शेड्यूलप्रमाणे पहिला एपिसोडचं सकाळी ९ वाजता चित्रीकरण सुरू होणार होतं. आम्ही सकाळी ६- ७ वाजता उठलो. आवरायला लागलो. उठल्यावर फ्रेश झाल्यानंतर बघितलं तर बायकोचे १० मिस्डकॉल होते. मग मी फोन केला. माझे वडील गेले, असे तिने मला सांगितलं.” “मी पुण्याचा असल्याने तिथे खूप चांगले मित्र होते. अनेक ओळखी आहेत. एका मित्राच्या माध्यमातून त्यावेळेचे पुण्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची संपर्क झाला. मी त्यांना सांगितलं, ते माझे वडील आहेत. तर आपण काय करू शकतो?

Prasad Oak मी शेवटचं वडिलांना पाहिलंच नाही.

परिस्थिती खूप बिकट आहे. मी काहीच करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर प्रश्नच नव्हता पुण्याला येण्याचा. एकतर प्रवास करताना खूप बंधन होती. त्यावेळी आपण सहज प्रवास करू शकत नव्हतो. एवढं करून ते ठेवणार नव्हतेच. म्हणून मी त्यांना विनंती केली की, भाऊ व्हिडीओ कॉल लावेल शेवटचं वडिलांना बघू दे. ते म्हणाले, नाही साहेब. इथे मोबाइल आणण्याची परवानगी नाहीये. तुमचे भाऊ मोबाइल बाहेर ठेऊन आलेत. त्यामुळे तेही शक्य नाही. ते म्हणाले, मला परवानगी नाहीये. मी नाही करू शकत. त्यामुळे मी शेवटचं वडिलांना पाहिलंच नाही. थोड्यावेळाने भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता आणि तिकडे मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो,” प्रसाद सध्या त्याच्या आगामी धर्मवीर २ या सिनेमासाठी चर्चेत असून प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रचंड आतुरता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img