7.6 C
New York

Bhabha Hospital : पेशंटची नर्सला मारहाण कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Published:

मुंबई

मुंबईच्या भाभा रुग्णालयात (Bhabha Hospital) एका महिला पेशंटने नर्सला मारहाण करून शिवीगाळ केली आहे. त्यामुळे रुग्णालयातील नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

महिला वॉर्डमध्ये आयशा कुरेशी या महिलेचे इंजेक्शन देण्याची वेळ झाली होती, तसेच हा वॉर्डही स्वच्छ करायचा होता. म्हणून नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी कुरेशी यांच्या कुटुंबीयांना थोडा वेळ बाहेर जायला सांगितलं. तेव्हा कुरेशी यांच्या कुटुबीयांना राग आला. कुरेशी यांनी तर नर्सच्या कानशिलातही लगावली. तेव्हा रुग्णालयातल्या अर्ध्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. तसेच प्रत्येक वॉर्डमध्ये सुरक्षारक्षक असावा अशी मागणीही केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img