21 C
New York

Nilesh Lanke : निलेश लंके यांनी घेतली समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट

Published:

अहमदनगर

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Loksabha) मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांची भेट. अण्णा हजारे यांची भेट घेऊन दोन्ही उमेदवारांनी घेतले आशीर्वाद. दरवर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार अण्णा हजारे यांच्या भेटीला जाऊन आशीर्वाद घेतला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी आज समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धीचे रहिवाशी आहेत. येथील मंदिरात ते राहतात, भ्रष्टाचारमुक्त भारत आणि लोकपाल कायद्यासाठी त्यांनी जनआंदोलन केले होते. अण्णांच्या या आंदोलनामुळे देशभरातील तरुणाई एकटवली होती. तेव्हापासून अण्णांच्या शब्दाला देशात मान आहे.

लढतींपैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडेही पाहिले जाते. येथील मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे विरुद्ध माजी आमदार निलेश लंके यांच्यात थेट लढत होत आहे. निलेश लंकेंनी यंदा खासदार विखेंविरुद्ध शड्डू ठोकला असून आपल्या आमदारकीचा राजीनामा राजीनामा देऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img