23.1 C
New York

Raj Thackeray : उज्वल निकम यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीच्या (Mahayuti) वतीने उत्तर मध्य मुंबईतून (North Central Mumbai) उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज उज्जवल निकम राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. उज्वल निकम यांनी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यातून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर, मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कामही सुरू केले आहे. लवकरच राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचार सभा देखील घेणार आहेत.

महायुतीचे उमेदवार यांनी राज ठाकरे यांचे भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कल्याण डोंबिवलीचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाणे मतदार संघातील उमेदवार नरेश म्हस्के यांनी राज ठाकरे यांची भेट बुधवारी घेतली होती. त्यानंतर आज उज्वल निकम यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली आहे यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img