रमेश औताडे, मुंबई
कुस्तीतील आपले गुरू हिंदकेसरी रोहित पटेल (Rohit Patel) यांच्या मार्गदर्शनाखाली मांडीवर थाप मारणारे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी (Vijay Chaudhary) यांना “पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पोलीस महासंचालक (Maharashtra DGP) रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी जाहीर केल्यामुळे स्कॉटलंड नंतर जगात नावाजलेल्या मुंबई पोलिस (Mumbai Police) विभागाची मान उंचावली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हॅटट्रिक नोंदविणाऱ्या विजय चौधरी यांनी महाराष्ट्र पोलीस दलात दोनवेळा सुवर्ण पदक जिंकले आहे. २०२३ साली कॅनडा येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विश्वास नांगरे पाटील आदी पोलिस अधिकारी वर्गाने विजय चौधरी यांचे अभिनंदन केले आहे.
तांबडी माती व मांडीवर थाप हा ता खेळ आंतरराष्ट्रीय स्थरावर विजय चौधरी यांनी पोलिस खात्यातून भारताचे नाव झळकावत कुस्ती किती महत्वाचा खेळ आहे हे दाखवून दिले आहे. कोणताही खेळ कमी नसून आपण त्याला जिद्द, चिकाटी, मेहनत या जोरावर पुढे घेऊन जाऊ शकतो.आता अजून विक्रम करत कुस्तीतील आपले गुरू हिंदकेसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मंडीवरील शड्डू ची थाप जगभर घुमवणार असे विजय चौधरी यांनी सांगितले.