3.8 C
New York

Chitra Wagh : ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टार, चित्रा वाघ यांचा आरोप

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात जाहिराती सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Uddhav Thackeray group) वतीने प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये एका पॉर्नस्टारचा (Porn Star) वापर केला गेला असल्याचा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार उद्धव ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाच्या ज्या जाहिराती येत असतात. त्यात अदुबाळ नाईटलाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट कंपनीच्या उबाठाच्या जाहिरातीमध्ये जे पात्र आहे ते पॉर्नस्टारचं आहे. या संबंधित चित्रा वाघ यांनी काही फोटो देखील दाखवले आहे.

ठाकरे गट राज्यात पॉर्न संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीमधील पात्र पॉर्नस्टार आहे. तोच पॉर्नस्टार विचारतो की, महिलांचे अत्याचार कधी थांबणार? हाच पॉर्नस्टार लहान वयांच्या मुलीसोबत अश्लील चित्रण करतो. बापाची भूमिका करणारा हा व्यक्ती उल्लू ऍपवरती घाणेरडे कृत्य करताणाच्या क्लिप आहेत, असं त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img