उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांचा सध्या महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांच्या प्रचारार्थ सभांचा धडाका सुरू आहे. यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यातील सणसर येथे सभा घेतली. त्यात त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यावर निशाणा साधला.यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आमचं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं. आमचे थोरले काका वसंतदादा पवार पोट निवडणुकीला उभे होते. त्यावेळी पवार साहेब विद्यार्थी होते. मात्र पूर्ण कुटुंब वसंतदादा पवारांच्या पाठीमागे असताना त्यांनी दादांना विरोध केला. त्यामुळे ही सुरुवात काही नवीन नाही. तसेच 2004 ला देखील राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्याने काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र साहेबांनी ती नाकारली. त्यामुळे असं वाटतं की, आता केलं ते 2004 ला केलं असतं तर बरं झालं असतं.
11 दिवसांनी मतदानाचा टक्का वाढला कसा? संजय राऊत
त्यानंतर 2014 ला देखील अचानक प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रवादीचा भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्यावेळी मी विचारलं असता पटेल म्हणाले होते की, ही आपली स्ट्रॅटेजी आहे. मग त्यांनी केली की, स्ट्रॅटेजी आणि मी केली की, गद्दारी असं कसं? असा सवाल अजित पवारांनी केला. तसेच अजित पवार म्हणाले की, पवार कुटुंबाचा 1962 चा इतिहास आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे वसंतदादा पवारांच्या पाठिमागे सर्व कुटुंब असताना ते त्यांचा प्रचार करत असताना देखील ते पराभूत झाले आणि कुटुंबातील एकटा माणूस पाठिंबा देत असलेली जागा जिंकली. यावेळी देखील तसंच होणार आहे. कारण आम्ही कामाची माणसं आहोत. असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा पवारांवर टीका केली.
Ajit Pawar …पण साहेबांनी ऐकले नाही
राज्याचे सगळे मी बघण्यास सुरुवात केली साहेब दिल्लीत गेले तेव्हा परंतु सगळ्या संस्था साहेबांकडे होत्या. सोनिया गांधी परदेशी आहेत. त्यांनी 1999 ला हा नवीन मुद्दा काढला आणि ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि नवीन पक्ष त्यांनी काढला. त्यानंतर पुन्हा काँग्रेस सोबत गेले. परंतु आम्ही काही बोलू शकत नव्हतो. कारण ते वडील होते. आमचे 2004 ला जास्त आमदार निवडून आले होते. विलासराव मला बोलले की मुख्यमंत्री तुमचा करा. पण साहेबांनी ऐकलं नाही. 2014 साली भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. विचारले तर म्हणाले की, ही स्ट्रेटजी आहे. त्यांनी केले की स्ट्रेटजी आणि आम्ही केले ते गद्दारी. हे अवघड आहे. त्यावेळी आम्हाला सांगितले की, आपल्याला मंत्रिमंडळामध्ये जायचे आहे, पण तसे झाले नाही. 2017 ला देखील आम्हाला चर्चा करायला लावली. भाजपसोबत त्यावेळी सगळे ठरले होते. त्यानंतर 2019 ला बैठक झाली. त्यावेळीही सगळे ठरले होते. अमित शहा यांनी मला सांगितले की, अजित आधीच अनुभव चांगला नाही. ठरले तसे वागावे लागेल. पण पुढे असे झाले नंतर मुंबईत आलो. त्यांनी सांगितलं की, शिवसेना आणि काँग्रेससोबत जायचं आहे.