22.9 C
New York

Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी स्वीकारलं आढळरावंच हे आव्हान

Published:

शिरुर

ओतूरच्या सभेत जे बोललो त्याचं पुराव्यानिशी उत्तर देतो, मग शब्द फिरवायचा नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचे (Shivajirao Adhalarao Patil) आव्हान स्वीकारलं.

महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओतूर मध्ये झालेल्या शरद पवारांच्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता. काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीच भल होतंय हे कळतय, असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले.

यानंतर दोन दिवसांनी आढळराव पाटलांनी कोल्हे यांनी केलेले आरोप फेटाळत, पुरावे द्या, राजकारणातून बाजूला होतो, असं आव्हान दिले. डॉ. कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारत पुरावे देतो शब्द फिरवायचा नाही असं प्रति आव्हान आढळराव पाटलांना दिलय. आता डॉ. कोल्हे यांनी पुरावे दिल्यावर आढळराव आपल्या शब्दावर ठाम राहतात का याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img