21 C
New York

Ahmednagar Lok Sabha Election : प्रचाराच्या अंतिम टप्प्यात लंकेंना मोठा धक्का

Published:

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम (Ahmednagar Lok Sabha Election) टप्प्यात आला असून आता पारनेरमधून निलेश लंकेंसाठी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पारनेरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. औटी यांच्या निर्णयामुळे लंकेना धक्का तर विखेंना पाठबळ मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नगर दक्षिणेतील दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. दरम्यान 2019 च्या पारनेर विधानसभा निवडणुकीमध्ये लंकेंकडून पराभूत झालेले विजय औटी यांनी आपली लोकसभेबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. अखेर पदाधिकाऱ्यांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

Ahmednagar Lok Sabha Election आपली भूमिका जाहीर केल्यानंतर औटी म्हणाले

आपली भूमिका जाहीर केल्यानंतर औटी म्हणाले की, माझ्यासह रामदास भोसले, श्रीकांत पठारे, अनिल शेटे आणि प्रियंका खिलारी अशा आम्ही पाच जणांनी एकत्रित निर्णय घेत सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. लोकसभेच्या अनुषंगाने तालुक्यातील जनतेने मतदान कुणाला करायचे याचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा. ज्यांना लोकसभेच्या कामकाजाचा चांगला अनुभव आहे तसेच त्यांना पुन्हा संधी मिळाली तर एक अनुभव समृद्ध असा खासदार आपल्या भागाला मिळू शकेल असे आमचे मत आहे असं यावेळी औटी म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की गेली तीन टर्म गेली पंधरा वर्षे मी आमदार म्हणून असताना कार्यकर्त्यांनी तसेच जनतेने मला भरभरून प्रेम दिलं. 2019 च्या पराभवानंतरही आजपर्यंत जनता ही माझ्याशी प्रामाणिक राहिली. मला साथ दिली. या निमित्ताने मी आवाहन करतो की महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा प्रचार करा. तसेच कुणालाही कोणतीही अडचण असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी पारनेरकरांना केले.

Ahmednagar Lok Sabha Election कोण आहेत विजय औटी ?

युती सरकारच्या काळात विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून विजय औटी यांनी काम पाहिले आहे. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून देखील ते नावाजलेले आहे. 2019 पर्यंत सलग तीन टर्म त्यांनी पारनेरची आमदारकी भूषवली आहे. मात्र 2019 च्या निवडणुकीमध्ये निलेश लंके यांच्याविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पारनेर नगरपालिका निवडणुकीत विजय औटी यांनी लंके यांना साथ दिली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img