19.7 C
New York

Delhi Schools : दिल्लीत 80 हून अधिक शाळांना धमकीचे ईमेल

Published:

शाळेमध्ये बॉम्ब  (Delhi Schools) ठेवण्यात आल्याचा ई-मेल आल्यामुळे राजधानी दिल्ली आणि नोएडा येथील 80 हून अधिक शाळांमध्ये खळबळ माजली. दिल्लीतील द्वारका येथील DPS तसेच मयूर विहारच्या मदर मेरी आणि नवी दिल्लीतील संस्कृति स्कूल व्यतिरिक्त नोएडा येथील DPS स्कूल यांसारख्या हायप्रोफाईल शाळांचा समावेश आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा ई-मेल पाठवण्यात आला होता. धमकीचा हा मेल मिळाल्यानंतर अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना तडकाफडकी घरी पाठवले.

मात्र यामुळे बुधवारी सकाळपासूनच दिल्लीत खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांना घरी लवकर घेऊन जा असे फोन अनेक शाळांतून आल्याने पालकांची धावपळ माजली. आपलं मूल सुरक्षित असेल ना या चिंतेपायी पालकांनी पटापट शाळेत धाव घेतली. एकंदरच शहरात गडबडीचे आणि चिंतेचे वातावरण होते. शाळांमध्ये बॉम्ब असल्याची या बातमीवर गृह मंत्रालयाचेही लक्ष आहे. हा ई-मेल कोणत्या आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला याबद्दल सायबर टीम कडून तपास करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहे. आतापर्यंत पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. बॉम्ब निकामी करणारी यंत्रणा शाळांच्या परिसरात तैनात करण्यात आलेली आहे.

डीपीएसने पालकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले की, शाळेला एक ईमेल प्राप्त झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना ताबडतोब घरी पाठवत आहोत. तसेच स्थानिक पोलिसांना बॉम्बच्या ईमेलसंदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांनी शाळेचा परिसर रिकामा केला आहे. शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. बॉम्ब शोधक पथक, बॉम्ब निकामी पथक आणि दिल्ली अग्निशमन दलाचे अधिकारी शाळांमध्ये दाखल झाले आहेत. मात्र शोध पथकाला अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. दरम्यान, फेब्रुवारीमध्ये, आरके पुरम येथील दिल्ली पोलीस शाळेतही अशीच धमकी मिळाली होती.

राजधानीतील साठ शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनं दिल्लीतील नागरिकांना चांगलाच हादरा बसला आहे. एका मेल आयडीवरुन साठ शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची ही धमकी देण्यात आली आहे. तपास पथकानं पाठवण्यात आलेल्या ई मेल आयडीचा आयपी अॅड्रेस शोधण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती पोलीस दलाच्या वतीनं देण्यात आली आहे. द्वारका इथल्या दिल्ली पब्लिक स्कूलला धमकी देण्यात आली होती. पोलीस आणि बॉम्बशोधक दलाचे जवान बॉम्बचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापही यामध्ये काही संशयास्पद आढळले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 Delhi Schools एकच Email अनेक शाळांना पाठवला

दिल्लीतील पोलीस अधिकाऱ्याने या धमकीच्या मेलवर प्रतिक्रिया दिली आहे. हा ईमेल देशाबाहेरून पाठवला गेला असावा असे ईमेलच्या आयपी ॲड्रेसवरून दिसत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशा प्रकारचे मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने एकच मेल एकाच वेळी अनेक खासगी तसेच सरकारी संस्थांना पाठवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. एका अज्ञात व्यक्तीने खोडसाळ भावनेतून हे कृत्य केले आहे, असेही या पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. आत्तापर्यंत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आलेली नाही. या धमकीचे मेल आले असले तरी त्या धमकीत काहीही तथ्य नाही, घाबरण्याचे काहीच कारण नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Delhi Schools या शाळांना मिळाला धमकीचा ई-मेल

  1. द्वारका येथील डीपीएस स्कूल
  2. रोहिणी येथील डीपीएस स्कूल
  3. वसंत कुंज मधील डीपीएस स्कूल
  4. नोएडा मधील डीपीएस स्कूल
  5. दक्षिण पश्चिम दिल्ली येथील डीएवी स्कूल
  6. पूर्वी दिल्ली येथील डीएवी स्कूल
  7. पीतमपुरा येथील डीएवी स्कूल
  8. नवी दिल्ली मधील संस्कृति स्कूल
  9. मयूर विहार मधील मदर मेरी स्कूल
  10. पुष्प विहार येथील का ॲमिटी स्कूल
  11. नजफगड मधील ग्रीन व्हॅली स्कूल

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img