22.9 C
New York

Supreme Court : वैदिक संस्कारांशिवाय हिंदू विवाह अमान्य

Published:

सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

केवळ व्यावहारिक फायद्यासाठी वैदिक संस्कारांना बगल देऊन केलेला विवाह मान्य नाही, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केली आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती बी. नागरत्ना (Justice B. Nagratna) यांच्या खंडपीठाने हा निकाल बुधवारी दिला.
घटस्फोटाबाबत एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर निरीक्षण नोंदवताना खंडपीठाने म्हटले आहे कि, हिंदू विवाह हा एक संस्कार आहे. तो नाच-गाण्यासाठी, दारु पिण्यासाठीचे निमित्त नाही. वैदिक पद्धतीने सप्तपदी आणि अन्य विधींशिवाय झालेला विवाह हा हिंदू विवाह म्हणून मान्य असूच शकत नाही. असा विवाह निरर्थक समजला जाईल. हिंदू विवाहसोहळ्यात सप्तपदीसारखे वैदिक विधी महत्त्वाचे आहेत.

हेही वाचा : अखेर नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरला

Supreme Court अशा विवाहांना अर्थ काय?

खंडपीठाने नोंदणी पद्धतीच्या विवाहाचा लोक ज्या पद्धतीने वापर करतात, त्यावर कोरडे ओढले आहेत. केवळ व्यावहारिक वापरासाठी लोक नोंदणीपद्धतीने विवाह करतात. नोंदणी करून परदेशात जाण्यासाठी लोक घाईघाईत विवाह उरकतात. अशा विवाहांना अर्थ काय? हिंदू विवाह हा एक संस्कार आहे. भारतीय समाजात विवाह ही एक महत्त्वाची आणि पवित्र संस्था म्हणून गणली गेली आहे. याचा विचार आजकालच्या तरुणांनी करायला हवा,” असे न्यायालयाने म्हटले आहे.

Supreme Court लग्न म्हणजे डामडौल, नाच-गाणे नव्हे

“लग्न म्हणजे केवळ हुंडा, वस्तूंची देवाण-घेवाण, डामडौल, नाच-गाणे, खाणे-पिणे असा प्रघात झाला आहे. पण विवाह संस्काराद्वारे स्त्री आणि पुरुष यांना पती-पत्नीचा दर्जा दिला जातो. त्यांच्यात एक विशिष्ट नातं तयार होतं,” अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img