नाशिक
नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) मतदारसंघाचा गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतील (Mahayuti) तिढा अखेर आज सुटला आहे. शिवसेना शिंदे (Shivsena Shinde) गटाच्या वतीने विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिक लोकसभा करिता भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आग्रही होते. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हेमंत गोडसे यांना तीव्र विरोध करण्यात आला होता.
Nashik Loksabha तब्बल एका महिन्यानंतर नावाची घोषणा
तब्बल एका महिन्यानंतर नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. महायुतीकडून यासंदर्भात परिपत्रक काढत हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पक्ष फुटीचे खरं कारण
Nashik Loksabha नाशिक लोकसभेचा तिढा सुटला
छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असं सुद्धा बोललं जात होतं. पण आज अखेर 1 मे महाराष्ट्र दिनी नाशिक लोकसभेचा तिढा सुटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच आज नाशिकचा उमेदवार जाहीर होईल असं म्हटलं होतं. त्यानुसार आज दुपारी उमेदवारीची घोषणा झाली आहे. नाशिक लोकसभेची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. महायुतीने इथून हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मागच्या दोन टर्मपासून नाशिकमधून हेमंत गोडसे खासदार आहेत.