21 C
New York

Sharad Pawar : शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Published:

निपाणी

देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते. नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. ही निवडणूक (lok sabha election) देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी महत्त्वाची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) साहेब यांनी म्हटले आहे.

देशाशाच्या लोकसभेची निवडणूक आली आणि भारताचा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. या निवडणूकीकडे जगाचं लक्ष आहे. आज ही स्थिती का झाली? भारत हा देश लोकशाहीचा देश आहे. स्वातंत्र्याआधी, स्वातंत्र्य मिळण्यासाठी या देशामध्ये अनेकांनी आयुष्याचा महत्त्वाचा काळ घालवला, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश लोकशाहीच्या पद्धतीने चालवायचा हा निकाल काँग्रेसच्या नेतृत्वाने केला. आपल्या आजूबाजूचे देश बघितले, पाकिस्तानमध्ये कधी लोकशाही असते, तर कधी लष्कराची हुकूमशाही असते. श्रीलंकेमध्ये मध्यंतरी हुकूमशाही होती. बांग्लादेशमध्ये लोकशाही आहे, एक काळ असा होता की तिथं लष्कराचं राज्य होतं. पण भारत हा देश असा आहे की इथे फक्त लोकांचं राज्य होतं, लोकशाही होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण जवाहरलाल नेहरू असो, नंतरच्या काळामध्ये लाल बहादूर शास्त्री असो, इंदिरा गांधी असो, राजीव गांधी असो या सर्वांनी सामान्य माणसाचा अधिकार आणि हा देश चालवायला लोकशाहीची पद्धती याबद्दल कधी तडजोड केली नाही. त्यामुळे हा देश लोकशाहीच्या मार्गावर गेला. लोकशाहीची परीक्षा या निवडणुकीमध्ये आहे.

आज या देशाची सूत्र नरेंद्र मोदींच्या हातात आहेत. ते तुमच्या व शेजारच्या राज्यात येऊन गेले असतील. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी अनेक आश्वासने दिली, अनेक गोष्टी सांगितल्या. पण त्यातील एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही. लोकशाही संकटात येईल अशा प्रकारचे पाऊल मोदी टाकत आहेत. सत्तेचा गैरवापर करून हा देश हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न या देशाचे प्रधानमंत्री व त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायची मोदींची गॅरंटी आहे? सामान्य माणसाला संकटात आणायचं, ही मोदींची गॅरंटी आहे? आज मोदी साहेब ही भाषा करतात आणि त्यांच्या हातात पुन्हा देशाचा कारभार दिला, तर आपण सगळेजण संकटात गेल्याशिवाय राहणार नाही. स्त्रियांचा, शेतकऱ्यांचा सन्मान नाही. शेतीमालाच्या किंमती हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्या आत्महत्यांचं कारण त्यांच्या घामाची किंमत त्यांना मिळत नाही, उत्पादन खर्चाचा विचार करून त्यांच्या शेतीमालाला किंमत मिळत नाही पण मोदी या सगळ्यांकडे ढुंकून बघायला तयार नाहीत.

काँग्रेसच्या हातामध्ये अलीकडच्या काळामध्ये दोन राज्य आली. त्यामध्ये कर्नाटकचा उल्लेख त्याठिकाणी करावा लागेल आणि त्या सरकारने जे काही निकाल घेतले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी सतीश जी, त्यांचे सहकारी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो, की त्यांनी सबंध देशाला एक नवीन रस्ता दाखवला. जो ग्रॅज्यूएट आहे व त्याला नोकरी नाही तर त्याला ३ हजार रुपये प्रती महिना देण्याचा निकाल त्यांनी घेतला. कुटुंब प्रमुख जी महिला आहे, तिला २ हजार रुपये प्रती महिना देण्याचा निकाल घेतला. याशिवाय सर्वांना मोफत बस प्रवास हे धोरण दिलं, २०० युनिट पर्यंत वीज बिल माफी हा निर्णय घेतला.

शेजारच्या तेलंगणा राज्यात काँग्रेसचं राज्य आलं तिथे शेतकऱ्यांना दर वर्षी १५ हजार रुपयांची मदत होते. १८ वर्षांवरील महिलांना २५०० रुपये दिले जातात, मोफत बस प्रवास दिला जातो आणि गॅस सिलेंडर ५०० रुपयांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांना ४०० रुपयांची पेन्शन. काँग्रेसच्या हातात राज्य गेल्यानंतर लोकांच्या हिताचे हे निर्णय घेतले व राबवले नुसती घोषणा केली नाही. मोदींच्या राजवटीमध्ये एकही निर्णय राबवला जात नाही, फक्त भाषणं केली जातात व विरोधकांवर टिका-टिप्पणी केली जातात.

ही स्थिती बदलायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाला गेल्यानंतर मतदान केंद्रावर पंजासमोरचं बटन दाबा आणि कर्नाटक, तेलंगणाने ज्या प्रकारचं उत्तम काम केलं, तसंच काम महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, अन्य राज्यांमध्ये स्थिती निर्माण करणाऱ्या भाजपला दूर करा

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img