5.5 C
New York

Sanjay Nirupam : निरूपम यांचं ठरलं, ‘या’ पक्षात करणार प्रवेश

Published:

मुंबई

काँग्रेसची माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde group) प्रवेश करणार आहे. प्रवेश संदर्भात संजय निरुपम यांनी स्वतःच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा म्हटले आहे. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीनंतर मी लवकरच तीस वर्षानंतर पुन्हा माझ्या घरी परतणार असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक असलेले संजय निरुपम हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे सोडण्यात आल्याने नाराज झाल्यानंतर काँग्रेसला सोडचिट्टी देत सर्व पदावरून राजीनामा दिला होता. संजय निरुपम शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढणार असे बोलले जात होतं मात्र आता या मतदारसंघात रवींद्र वायकर यांची शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यानंतर आज मुंबईतील लोकसभा निवडणुकी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब भवानी येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीनंतर एकनाथ शिंदे आणि संजय निरूपम यांची भेट झाली त्यानंतर शिंदे गटात प्रवेश करण्याची निश्चित झालं असल्याचं निरूपम म्हटले आहे.

Sanjay Nirupam पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार

संजय निरुपम म्हणाले की, बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यानंतर त्यांना भेटायला आलो होते. पुढे काय करायचं याच्यावर आमच्यामध्ये विस्तृत चर्चा झाली आहे. परवा 3 ते 4 वाजता शिवसेना पक्षात प्रवेश करणार, पुढील माहिती तुम्हाला पक्षाकडून भेटेल. आमच्या भेटीमध्ये पुढे कसं काम करायचं यासंबंधी चर्चा झाली. परवा सगळ्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करेन पक्षाच्या सगळ्या उमेदवारांचा मी प्रचार करणार असून तीस वर्षांनंतर पुन्हा मी माझ्या पक्षात प्रवेश करत आहे, याचा अनंद आहे. असं निरुपम म्हणाले.

हेही वाचा : भाजप व आरएसएस आरक्षण विरोधी – नाना पटोले

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img