नवी दिल्ली
प्रसिद्ध टीव्ही कलाकार अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने (Rupali Ganguly) भारतीय जनता पार्टीत आज भाजपचे (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर तर काही सेलिब्रिटी प्रमाणे रूपालीने राजकीय क्षेत्रात एन्ट्री केले आहे.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती देताना रुपाली गांगुलीने देशाचे नागरीक म्हणून भाजपला समर्थन करायला हवं असं आवाहन रुपाली गांगुलीने केलं. महाकाल आणि माता राणीच्या आशिर्वादामुळे कलेच्या माध्यमातून मी अनेक लोकांना भेटत असते, आणि जेव्हा मी विकासाचा महायज्ञ पाहाते तेव्हा असं वाटतं मी ही यात सहभागी व्हावं, अशी प्रतिक्रिया रुपाली गांगुलीने दिलीय.
भाजप नेते विनोद तावडे यांचं मार्गदर्शन आणि अमित बिनोनी यांचा आशिर्वाद आपल्याला मिळाल्याचंही तीने सांगितलं. पीएम मोदी यांनी देशाला दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर आपण चालू आणि देशाची सेवा करु असंही रुपाली गांगुलीने सांगितलं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाईन आणि एक दिवस त्यांना माझा अभिमान वाटेल अशी कामगिरी करेन. मला तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे मी जे काही काम करेन ते चांगलं आणि योग्य करेन. माझे काही चुकले तर तुम्ही मार्गदर्शन करा असं रुपाली गांगुलीने म्हटलंय.