लखनऊ सुपर जायंट्सने (MI vs LSG) आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 48 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध 4 विकेटने जिंकला. मुंबई इंडियन्सने लखनऊला विजयासाठी 145 धावांचे आव्हान दिले होते. लखनऊने हे विजयी आव्हान 19.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह लखनऊने प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. लखनऊचा हा सहावा विजय आहे, तर मुंबईचा हा सातवा पराभव आहे. लखनऊविरुद्धच्या या पराभवामुळे मुंबईचे प्लेऑफचे समीकरण खूपच कठीण झाले आहे.
लखनऊकडून मार्कस स्टॉइनिसने 62 धावा केल्या. लखनऊकडून स्टॉइनिसने सर्वाधिक धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने 28 धावा जोडल्या. दीपक हुडाने 18 धावा केल्या. ॲश्टन टर्नरने 5 आणि आयुष बडोनीने 6 धावा केल्या. निकोलस पूरन आणि कृणाल पांड्या या जोडीने लखनऊला विजय मिळवून दिला. निकोलसने नाबाद 14 धावा केल्या. क्रुणाल 1 धावा करून परतला. मुंबईकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक 2 बळी घेतले. नुवान तुषारा, जेराल्ड कोएत्झी आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
हेही वाचा : १७ महिने मैदानाबाहेर मात्र, वर्ल्डकप संघात एंट्री
त्याआधी लखनऊ सुपर जायंट्सने MI vs LSG नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजी करण्यास पाचारण केले. लखनऊचा कर्णधार केएल राहुलचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय गोलंदाजांनी अचूक ठरवला. लखनऊच्या गोलंदाजांनी मुंबईला 20 षटकांत 7 गडी राखून 144 धावांवर रोखले. मुंबईतील चारच खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला.
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे समीकरण खूपच कठीण मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील हा सातवा पराभव
या विजयासह लखनऊ सुपर जायंट्स संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केला आहे. मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत तळाशी आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न जवळपास भंगले आहे. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील हा सातवा पराभव आहे. आतापर्यंत फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे उर्वरित चार सामने जिंकल्यास त्यांचे 14 गुण होतील. त्यामुळे मुंबईच्या भविष्याची सगळी गणिते नेट रन रेट चांगला असणे आवश्यक असण्यावर अवलंबुन आहे. राजस्थान रॉयल्स संघ १६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर, कोलकाता नाइट रायडर्स 12 गुण आणि +1.096 नेट धावगतीसह दुसऱ्या स्थानावर आहे. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईला हरवून तिसरे स्थान गाठले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांची चौथ्या आणि पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स 10 आणि 0.810 नेट रन रेटसह चौथ्या, सनरायझर्स हैदराबाद 10 0.075 सह पाचव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स 10 गुण आणि -0.442 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.113 नेट रनरेटसह सातव्या, पंजाब किंग्ज 6 गुण आणि -0.187 नेट रनरेटसह आठव्या, मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.272 नेट रनरेटसह नवव्या आणि RCB 6 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
हेही वाचा : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकणाऱ्या चार संघांची नावे