महायुतीच्या (Shivsena) ठाण्याच्या जागेवरून महायुतीतील चर्चा अखेर पूर्णत्वास गेली आहे. नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. काल झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे लोकसभेबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे यांची मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. यानंतर मुख्यमंत्र्यांना उमेदवार निवडण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. जो उमेदवार असेल त्याला सर्व ताकद लावली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
उद्या अर्ज भरला जाण्याची शक्यता
ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असली तरी महाआघाडीने अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र, महाआघाडीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज भरला नसल्याचे दिसून आले होते, उद्या अर्ज भरला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच आज सकाळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईतील सहापैकी सहा जागा आम्ही जिंकू’. महायुतीतील नाशिकच्या जागेचा वाद अद्याप सुटलेला नाही, असे विचारल्यास मुख्यमंत्री म्हणाले की, नाशिकचा तिढा आज सुटणार असून तुम्हाला लवकरच बातमी मिळेल.