22.9 C
New York

LPG Cylinder : महाराष्ट्र दिनी LPG सिलिंडर झाले स्वस्त

Published:

महाराष्ट्र दिनी संपूर्ण देशातील नागरिकांना मोठं गिफ्ट मिळालं असून, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत व्यावसायिक सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमतीत किमतीत तब्बल 19 रूपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईच्या वाढत्या आलेखात सर्वसामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 19 रुपयांनी कमी केल्या आहेत. मात्र, आज (दि.1) व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये 19 रूपयांची कपात करण्यात आली आहे.

LPG Cylinder घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल नाही

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग दुसऱ्या महिन्यात कोणताच बदल दिसला नाही. यापूर्वी 9 मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी झाल्या होत्या. तेव्हापासून या किंमती स्थिर आहेत. दबाव असतानाही तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचा भाव वाढवलेला नाही. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपये, कोलकतामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नईत हा भाव 818.50 रुपये आहे.

हे ही वाचा : मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे समीकरण खूपच कठीण

आज कपात करण्यात आलेल्या कपातीनंतर मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी 1,717.50 रुपयांऐवजी आता 1,698.50 रुपये मोजावे लागणार आहेत. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो, त्यात सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून, सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने बाहेरील खाद्य पदार्थ कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LPG Cylinder यापूर्वी महिला दिनी मिळाली होती गुड न्यूज

सरकारी तेल कंपन्यांकडून सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणतीही कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही. मार्च महिन्यात महिला दिनी केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरच्या किमती कमी करत देशातील करोडो महिलांना महिलादिनी गुड न्यूज दिली होती. त्यावेळी सरकारने घरगुती सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली होती. याशिवाय मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती. मात्र, आज (दि.1) व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये 19 रूपयांची कपात करण्यात आली आहे. पण घरगुती सिंलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img