21 C
New York

Kranti Redkar : क्रांती रेडकरने जुळ्या मुलींच्या टोपण नावामागची सांगितली रंजक कहाणी

Published:

अभिनेत्री क्रांती रेडकरची (kranti Redkar) आपल्या अभिनय व नृत्य कौशल्याची सिनेसृष्टीत एक वेगळी अशी ओळख आहे. एवढंच नाही तर क्रांतीने दिग्दर्शन क्षेत्रातही एक वेगळीच छाप उमटवली आहे. अशी ही सुप्रसिद्ध अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नेहमीच्या घडणाऱ्या गोष्टी व मुलींच्या गमती जमती चाहत्यांसोबत शेअर करत असते. क्रांतीच्या २ गोंडस जुळ्या मुलींचे व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. आता नुकताच अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात तिने जुळ्या मुलींच्या टोपण नावामागची रंजक गोष्ट सांगितली आहे.

Kranti Redkar : जुळ्या मुलींची टोपण नावं ‘छबिल’ व ‘गोदो’

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या जुळ्या मुलींची टोपण नावं ‘छबिल’ व ‘गोदो’ अशी आहेत तर त्यांची खरी नावं ‘झिया’ व ‘जायदा’ (Ziya & Zyda) ही आहेत. क्रांती प्रत्येक व्हिडीओमध्ये मुलींना त्यांच्या टोपण नावानेच हाक मारताना दिसत असते. नुकत्याच आता शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये क्रांतीने सांगितलं की, छबीलने स्वतः च लुकस वानखेडे असं नवीन नाव ठेवलं आहे. आणि छबील आम्हाला सांगते, आणि माझं टोपण नाव लुका. जवळपास एखाद्या भाई च वैगेरे नाव, लुका भाई वानखेडे असं काहीतरी. आणि गोदोचं नाव गोदोचं आहे.”

हेही वाचा सलमान प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

Kranti Redkar …त्यावरूनच छबिली असं नाव ठेवलं

क्रांती रेडकर म्हणाली, “तुम्ही सगळे मला सारखं विचारता ना मुलींची नाव अशी का आहेत ? ‘छबील’ च्या मागची गोष्ट अशी की, ‘छबील’ म्हणजे झाशीची राणी याचं टोपण नाव छबिली असं होतं. त्याच्यावरूनच समीरने छबिली असं नाव ठेवलं. पण नंतर झालं ‘छबिल’. ‘वेडिंग फॉर गोदो’ हे आहे कादंबरी, नाटक त्यावरून गोदोच नाव आहे. छबील चा जन्म झाल्यानंतर आम्ही ज्या बाळाची वाट पाहत होतो ती गोदो होती. आणि आता गोदोची गोदावरी झाली आहे, कारण माझी आई तिच्यामागे गोदावरी गोदावरी करत असते. गोदोची झाली गोदावरी. पण ‘छबील’चा लुकस झालाय त्याचं काय करायचं? लुकस द लुका, लुका भाई.”

अशातच क्रांतीचे चाहते आहेतच, पण क्रांतीच्या मुलींच्या व्हिडीओवर चाहते भरभरून प्रेम करत असतात. क्रांतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालायं. “मला नावाच्या मागची गोष्ट आवडली”, “लुका बाळ”, “गोड नावं आहेत”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट्स करून चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे.

दरम्यान, क्रांतीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, क्रांतीने जितेंद्र जोशी आणि उर्मिला कोठारे यांचा ‘काकण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होत. त्यानंतर शेवटची ‘कलर्स मराठी’च्या ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात ती झळकली होती. ‘ढोलकीच्या तालावर’या कार्यक्रमात क्रांतीने परीक्षकाची भूमिका बजावली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img