21 C
New York

Harbour Line : लोकल रुळावरुन घसरल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत

Published:

मुंबई

हार्बर रेल्वे (Harbour Line) मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबईच्या उपनगरीय लोकल (Mumbai Local) सेवेतील हार्बर मार्गावर आज पुन्हा रिकामी लोकल घसरली आहे. वडाळा (Vadala) -सीएसएमटी (CSMT) लोकल (Local) सीएसएमटी रेल्वे स्थानकात रुळावरुन घसरल्याची घटना घडली आहे. तीन दिवसात दुसऱ्यांना ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. चाचणीदरम्यान ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

हार्बर लाईनवर सोमवारी लोकलचा एक डबा घसरल्याची दुर्घटना घडली होती. त्याच ठिकाणी दुरुस्तीनंतर आज पुन्हा रिकामी लोकल चालवण्यात आली होती. मात्र, सोमवारी रेल्वेचा डबा घसरला, त्याच ठिकाणी पुन्हा रेल्वेचा डबा घसरल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img