8.3 C
New York

Eknath Shinde: नाशिकचा तिढा आज सुटणार ?

Published:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबईच्या हुतात्मा चौकात येऊन १०६ हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळेस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्र दिनाच्या, जागतिक कामगार दिनाच्या सर्वाना शुभेच्छा. १०६ हुतात्म्यांनी बलिदान देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळवला, तो दिवस. हुतात्म्यांना अभिवादन करत त्यांनी याच दिवशी मंगल कलश महाराष्ट्रात आला. त्यामुळे पुन्हा एकदा हुतात्म्यांना अभिवादन. हुतात्मा स्मारकावर आल्यानंतर लोकांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. १०६ हुतात्म्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हा तोच महाराष्ट्र आहे जिथे राज्याने देशाचा विचार केला आणि संविधान दिले. “६५ वर्षे खूप मोठा पल्ला आहे. बरेच काही करायचे बाकी आहे. गेल्या दोन वर्षांत सर्वसामान्यांच्या सरकारने अनेक निर्णय घेतले. योजना आणल्या, अनेक विकास प्रकल्पांना चालना दिली. त्यामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच खरा ध्यास आहे. गरीब लोकांच्या जीवनात आनंद आणणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

दुर्दैवाने राजकारणाची पातळी खालावली

महाराष्ट्राने देशाला विचार आणि दिशा दिली. पण त्याच महाराष्ट्रात राजकारणाची भाषा बिघडताना दिसत आहे, या पत्रकारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. “महाराष्ट्र हे संस्कृत राज्य आहे. पुरोगामी महाराष्ट्राला परंपरा आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण राज्यकर्ते कोण आणि काय करतात ते मागे राहते. दुर्दैवाने राजकारणाची पातळी खालावली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधकांकडून दररोज अपमान आणि शिव्या देण्यापलीकडे काहीही ऐकायला किंवा पाहायला मिळत नाही.

मुंबईतील सहापैकी सहा जागा आम्ही जिंकू,’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महायुतीतील नाशिकच्या जागेचा वाद अद्याप सुटलेला नाही, असे विचारल्यास मुख्यमंत्री म्हणाले की, नाशिकचा तिढा आज सुटणार असून तुम्हाला लवकरच बातमी मिळेल.

आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img