26.6 C
New York

Amit Thackrey : व्यंगचित्रकार उन्मेष शहाणे यांचा अमित ठाकरे यांच्या हस्ते सत्कार

Published:

Amit Thackrey ५ मे जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य !

विविध वृत्तपत्रे, मासिके तसेच अन्य सोशल मीडियावर आपली व्यंगचित्रे प्रसिद्ध करणाऱ्या काही निवडक दहा चित्रकारांचा शनिवारी दिनांक ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackrey) यांच्या हस्ते, हा सोहळा पार पडणार आहे. यात सोलापूरचे व्यंगचित्रकार उन्मेष शहाणे यांचा समावेश आहे.

Amit Thackrey कार्टून्स कट्टा पुणे यांचे मार्फत बालगंधर्व कला दालन येथे आयोजित

व्यंगचित्रकार आपल्या चित्रातून समजातील दोषावर तसेच समाज व्यवस्थेवर बोट ठेवत असतो, अशा काही निवडक व्यंगचित्रकारांच्या कार्याचा कौतुक सोहळा कार्टून्स कट्टा पुणे यांचे मार्फत बालगंधर्व कला दालन येथे आयोजित करण्यात आल्याचे ‘ बोलक्या रेषा’ कार प्रसिद्ध व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांनी सांगितले. या कार्यक्रमास प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दिनांक ४ ते ६ मे रोज सकाळी ११ ते ८ दरम्यान या तीन दिवसीय कार्यक्रमात कार्यशाळा, आणि घनश्याम देशमुख यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनाचा लाभ कला रसिकांना मिळणार आहे. याप्रसंगी छोट्यासाठी चित्र कसे रेखाटावे याचे प्रात्यक्षिक, कला साहित्यासह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना अगदी मोफत असणार आहे. सोबत प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. दिनांक ४ ते ६ या तीन दिवसीय संपूर्ण कला सोहळ्याचा आणि सुमारे ३०० चित्र प्रदर्शनाचा आस्वाद सर्व कलाकारांनी तसेच कला रसिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक घनश्याम देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा महाराष्ट्र दिनी LPG सिलिंडर झाले स्वस्त

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img