23.1 C
New York

Sanjay Raut : …दादा पुन्हा दैवत बदलतील राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Published:

शरद पवारांची साथ सोडून गेलेले अजित पवार पुन्हा आपलं दैवत बदलतील असं भाकित ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. विशेष म्हणजे अजितदादा दैवत केव्हा आणि कोणत्या कारणामुळे बदलतील याबाबतही भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, अजित पवार यांनी दैवत बदलला आहे. 2024 ला सरकार बदलेल मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेला असेल. आपण कोणाच्या चरणाची बसून हुजरेगिरी करत आहे, त्याचे हे लक्षण असल्याच म्हणत त्यांनी शिंदेंवरही हल्लाबोल केला आम्हाला त्यात पडायचं नाही. (Sanjay Raut On Ajit Pawar Party Change)

Sanjay Raut महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी काही आत्मे फडफडत आहेत

महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून सतत त्यांच्यावर अनेकांची, व्यापारांची वक्रदृष्टी कायम राहिलेली आहे ती आज सुद्धा आहे. महाराष्ट्रातच अखंडत्व आणि वैभव टिकवण्यासाठी ही लढाई पुन्हा नव्याने सुरू झाल्याचे राऊत म्हणाले. दिल्लीवरून मोदी आणि शहा (Amit Shah Narendra Modi) यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत आहेत आणि त्यांच्यापासून महाराष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर पडलेली आहे.

काही भटकते आणि वकवकते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत, महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके तोडत असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्र लुटला जात असून, महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केला जात आहे. मात्र, लढवय्या महाराष्ट्राला आणि शिवसेना जोपर्यंत इकडे ठामपणे उभी आहे तोपर्यंत यांना ते शक्य नाही म्हणून या लोकांनी शिवसेना तोडल्याचे राऊत म्हणाले. शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला पण या वेळेला काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभे राहतील आणि लढत राहतील. आजच्या महाराष्ट्र दिन महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनता या परिस्थितीचा विचार करत आहे हे आम्हाला साधारण दिसत आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याआधी संभाजीनगर मधील औरंगजेबाची कबर पाहून यावी आणि 107 हुतात्मा यांचा स्मारक जे फोर्ट ला आहे हे सुद्धा पाहुण यावे. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते याची दोन्ही प्रतिकं आहेत. सध्याच्या महाराष्ट्राची परिस्थिती यापूर्वी नव्हती महाराष्ट्र हा दिल्ली पुढे कधीच झुकला नाही हा इतिहास आहे आणि हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून चिंतामणराव देशमुख असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे असतील महाराष्ट्र झुकला नाही आणि महाराष्ट्र आपल्या स्वाभिमानासाठी लढत राहिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img