9.5 C
New York

Yuvraj Singh : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकणाऱ्या चार संघांची नावे

Published:

भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंगने (Yuvraj Singh) T20 विश्वचषक (T20 World Cup 2024) संदर्भात नुकतीच एक भविष्यवाणी केली आहे. युवराजने यावेळच्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकणाऱ्या चार संघांची नावे जाहीर केली आहेत. एका वाहिनीशी संवाद साधताना युवराज सिंगने टॉप 4 संघांच्या नावांबद्दल सांगितले आहे. खरं तर, आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा युवीला विचारण्यात आले की, यावेळी उपांत्य फेरीत कोणते चार संघ आहेत, जे उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. या प्रश्नावर युवीने प्रतिक्रिया देत आपल्या आवडीच्या चार संघांची नावे जाहीर केली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंडियाची घोषणा

Yuvraj Singh युवीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सलग 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते

युवराज सिंगच्या मते, भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ यावर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचतील. भारतीय संघ २००७ मध्ये पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. 2007 च्या टी-20 विश्वचषकात भारताला विश्वविजेते बनवण्यात युवराजच्या कामगिरीचा मोठा वाटा होता. युवीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सलग 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते, जे आजपर्यंत चाहते विसरलेले नाहीत.
युवीने स्टुअर्ट ब्रॉडच्या सलग 6 चेंडूंवर 6 षटकार ठोकले होते. 2007 च्या T-20 विश्वचषकात युवराज सिंगने 6 सामन्यांच्या 5 डावात फलंदाजी करताना 148 धावा केल्या होत्या. या T-20 विश्वचषकात भारताचा कर्णधार धोनी होता. भारताव्यतिरिक्त, पाकिस्तान संघाने देखील 2009 मध्ये T20 विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर इंग्लंडने २०१० आणि २०२२ मध्ये विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले होते. ऑस्ट्रेलियन संघ 2021 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला. तसे पाहता, वेस्ट इंडिज संघाने सर्वाधिक वेळा T-20 विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडिजने 2012 आणि 2016 मध्ये विजेतेपद मिळवून आश्चर्यकारक कामगिरी केली होती. या संघांव्यतिरिक्त श्रीलंकेने एकदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. श्रीलंकेने २०१४ साली भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

अशाप्रकारे आहे भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img