3.2 C
New York

Sharad Pawar : होय मी भटकती आत्मा, पण जनतेसाठी!

Published:

Sharad Pawar : शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर

जुन्नर : माझा आत्मा अस्वस्थ (Wandering Soul) आहे, पण स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थ होईन, असे सडेतोड प्रत्त्युत्तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना दिले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूरमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार ऍड. राम कांडगे, दिलीप ढमढेरे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे, बाबा परदेशी, अनंतराव चौगुले, सुनिल मेहेर, बाजीराव ढोले, शरद चौधरी, बाळासाहेब बाणखेले, अल्लूभाई ईनामदार,अनिल तांबे, दीपक औटी, बाबू पाटे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, किशोर दांगट, शरद लेंढे, सुरज वाजगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : दक्षिण मुंबईमधून शिंदे गटाकडून ‘या’ उमेदवाराची घोषणा

शरद पवार म्हणाले, आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. मी कोणाला वाईट बोलणार नाही. माझे बोट धरून राजकारणात आले, तेच माझ्याबद्दल काय बोलतात. एक आत्मा भटकत आहे, त्यापासून सुटका व्हायला हवी, असं मोदी म्हणतायत. पण, माझा आत्मा जनतेसाठी अस्वस्थ आहे.”

Wandering Soul ही हुकूमशाही नाही का?

मोदींवर टीका करताना पवार म्हणाले, पंतप्रधान काल म्हणाले होते कि मी ईडीचा एक टक्काही वापर करत नाही. पण, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अशा विरोधी नेत्यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ईडीने अटक केली. चांगले काम करणाऱ्या नेत्यांविरुद्धच सत्तेचा गैरवापर केला जात आहे. ही हुकूमशाही नाही का? सत्तेचा वापर जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा असतो, पण इथं लोकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय.

हेही वाचा : १७ महिने मैदानाबाहेर मात्र, वर्ल्डकप संघात एंट्री

Wandering Soul हे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना शहजादे म्हणून हिणवतात. यावर शरद पवार म्हणाले, “राहुल गांधींच्या तीन पिढ्यांनी देशाची लोकशाही बळकट कराताना जीवाचे रान केले. देशाला तंत्रज्ञानाचा चेहरा देणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. अशा राहुल गांधींना शहजादे म्हणून हिणवले जाते, हे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा काढून शेतकरी, तरुण, महिला, बेरोजगार यांचे प्रश्न जाणून घेतले. यावर मोदी काही बोलत नाहीत. काहीतरी खोट्या गोष्टी सांगून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. मी पंडित नेहरूंची भाषणे ऐकली आहेत. त्यांनी निवडणूक प्रचारात कधीही विरोधकांवर टीका केली नाही. देशाचा स्वातंत्र्य लढा, देशाच्या विकासाचे व्हिजन यावर ते बोलत असत.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img