23.1 C
New York

T20 World Cup SQUAD Announced: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंडियाची घोषणा

Published:

सध्या आयपीएलचा फिव्हर ऐन रंगामध्ये आला आहे. आपल्या टीम सोडून आपले आवडते खेळाडू कसे प्रदर्शन करत आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. अशातच आता T20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा (T20 World Cup SQUAD Announced) करण्यात आली आहे. बीसीसीआयने 15 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप खेळणार आहे. टीम इंडियात कोणते खेळाडू खेळणार आणि कोण नाही? यावर बरीच चर्चा झाली. आता या सर्व चर्चा बंद झाल्या आहेत.

केएल राहुलला विश्वचषक संघातून वगळण्यात आले

बीसीसीआयने डेडलाइनच्या एक दिवस आधी टीम इंडियाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनंतर भारताने संघ जाहीर केला आहे. हार्दिक पांड्या की ऋषभ पंत हा वादाचा विषय होता. मात्र आता यावरही पडदा पडला आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल यावर शिक्कामोर्तब झाले आहे. संजू सॅमसनचीही संघात निवड झाली आहे. केएल राहुलला विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या हाती असेल. फिरकीपटूंची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर असेल.

अशाप्रकारे आहे भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

टी 20 वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंगला आयसीसीने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img