सांगली
सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) अपक्ष शड्डू ठोकल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील (Vishal Patil) यांनी सभा, बैठकांचा धडाका लावला आहे. एकीकडे विशाल पाटील यांनी मतदारसंघातील जुन्या नेत्यांच्या गाठीभेठी सुरू केल्या असतानाच आता वंचितची ताकदही विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) सांगली लोकसभेत विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
Sangli Loksabha सांगलीत हे तीन उमेदवार रिंगणात
सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रहार पाटील तर भाजपच्या वतीने विद्यमान खासदार संजय काका पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे. काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी उमेदवारी मिळावी याकरिता सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी देखील प्रयत्न केला होता. मात्र ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आल्यानंतर नाराज असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
ठाकरेंच्या ‘या’ निकटवर्तीयाला शिंदे गटाकडून उमेदवारी
Sangli Loksabha विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे पाठिंबा
विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला या मतदारसंघातून तीन लाखाच्या जवळपास मतदान मिळाले होते. एकीकडे विशाल पाटील यांनी प्रचारसभांचा धडाका लावला असतानाच वंचित बहुजन आघाडीनेही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वंचितने विशाल पाटील यांना दिलेला पाठिंबा मुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील चित्र बदलण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्षामध्येच मोठी नाराजी
दरम्यान, सांगली लोकसभेत विशाल पाटील यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर काँग्रेस पक्षामध्येच मोठी नाराजी पसरली होती. आमदार विश्वजित कदम यांनी या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींसमोरच मनातील खंत बोलून दाखवली होती. त्यानंतर विश्वजित कदम चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार का? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र विश्वजित कदम यांनी आघाडीधर्म पाळत चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे.