T20 विश्वचषक 2024 (T20 World Cup) साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची निवड करण्यासाठी भारतीय निवडकर्त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. संघ निवडीमध्ये एक नाव सगळ्यांना आनंद देत आहे ते म्हणजे यष्टीरक्षक रिषभ पंतची (Rishabh Pant) संघामध्ये पुन्हा एकदा एंट्री झाली आहे. गेल्या १७ महिन्यापासून मैदानाबाहेर राहिलेल्या पंत आयपीएलमध्ये आपले चांगले प्रदर्शन दाखवत निवडकर्त्यांवर भुरळ पाडण्यास यशस्वी ठरला आहे असे म्हणायला हरकत नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंडियाची घोषणा
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कार अपघातानंतर टीम इंडियातून बाहेर
भारतीय निवडकर्त्यांनी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांचा टीम इंडियात T20 विश्वचषक 2024 साठी यष्टिरक्षक म्हणून समावेश केला आहे. ऋषभ पंत 17 महिन्यांनंतर टीम इंडियात परतला आहे. ऋषभ पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कार अपघातानंतर टीम इंडियातून बाहेर होता. मात्र तो नुकताच आयपीएलमधून क्रिकेटच्या मैदानात परतला असून आता तो टीम इंडियाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
कार अपघातापर्यंत ऋषभ पंत टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळत होता. अशा स्थितीत त्याचे पुनरागमन ही टीम इंडियासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ऋषभ पंतने टीम इंडियासाठी आतापर्यंत 33 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 66 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 43.67 च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत, एकदिवसीय सामन्यात त्याने 34.6 च्या सरासरीने 865 धावा केल्या आहेत आणि T20 मध्ये त्याने 22.43 च्या सरासरीने 987 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनंतर भारताने संघ जाहीर केला आहे. हार्दिक पांड्या की ऋषभ पंत हा वादाचा विषय होता. मात्र आता यावरही पडदा पडला आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल यावर शिक्कामोर्तब झाले आहे. संजू सॅमसनचीही संघात निवड झाली आहे. केएल राहुलला विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या हाती असेल. फिरकीपटूंची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर असेल.
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकणाऱ्या चार संघांची नावे