3.2 C
New York

Ravindra Waikar : वायकरांच्या प्रचारासाठी सोमय्या स्टार प्रचारक?

Published:

मुंबई

शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर पश्चिम मुंबई (North West Mumbai Loksabha) मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने यापूर्वीच अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिंदे गटाचे आभार मानत या मतदारसंघात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे. आता या मतदारसंघात कीर्तिकर विरुद्ध वायकर अशी लढत होणार आहे.

Ravindra Waikar जोगेश्वरी मतदारसंघात सर्वात जास्त लीड

सचिन आहेर म्हणाले की, मी शिंदे गटाचे अभिनंदन करतो की त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघाची निवडणूक रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊन सोपी करून दिली रवींद्र वायकर हे आमचे चांगले मित्र आहेत वायकर यांनी शिंदे गटात कोणत्या परिस्थितीत प्रवेश केला आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे वायकर यांच्या जोगेश्वरी मतदारसंघात सर्वात जास्त लीड अमोल कीर्तिकर यांना मिळेल असे सचिन अहिर म्हणाले.

आणखी वाचा सांगलीत ‘वंचित’चा ‘या’ उमेदवाराला पाठिंबा

Ravindra Waikar किरीट सोमय्या यांनी स्टार प्रचारक

सचिन अहिर म्हणाले की, वायकर यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होता. किरीट सोमय्या यांनीही त्यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली होती. किरीट सोमय्या यांनी आता स्टार प्रचारक म्हणून रवींद्र वायकर यांच्या प्रचाराला यावं. भाजप सोडा पण अंतर्गत पक्षात उमेदवार मिळत नाही म्हणून नाईलाजास्तवर वायकर यांना उमेदवारी दिली. मुंबईच्या सर्व जागांवर त्यांना उमेदवार बदलावा लागला, नवे उमेदवार द्यावे लागतात, इथेच आमचा विजय आहे असं सचिन अहिर म्हणाले.

उमेदवारापेक्षा पक्ष महत्त्वाचा

सचिन अहिर म्हणाले की, उमेदवारापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जाऊन वायकरांना उमेदवारी दिली आहे. वायकर हे उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणार आहेत का? त्यांना कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतला हे सर्वांना माहिती आहे. उद्या त्यांचा पराभव होणार आहे, त्यामुळे त्यांना विधानसभेला उमेदवारी देणार आहेत का? त्यांनी मुंबई महापालिकेची तयारी करावी असं सचिन अहिर म्हणाले.

आणखी वाचा ‘बेस्ट’ची लवकरच दरवाढ, नवे दर काय?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img