8.3 C
New York

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या ‘या’ निकटवर्तीयाला शिंदे गटाकडून उमेदवारी

Published:

मुंबई

मुंबई उत्तर पश्चिम (Mumbai North West Loksabha) मतदारसंघातून अखेर महायुतीकडून (MahaYuti) उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) उमेदवारच नाव जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) काही दिवस आधी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाच्या वतीने अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती.

Uddhav Thackeray रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून महायुतीच्या वतीने रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय होते. मात्र नुकताच त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. वायकर यांच्यावर ईडी कडून होत असलेल्या कारवाईमुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचं बोललं जात होतं.

Uddhav Thackeray ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून महायुतीच्या वतीने रवींद्र वायकर यांचा सामना महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याशी होणार आहे. अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांचे पुत्र आहेत. गजानन किर्तीकर हे शिवसेना शिंदे गटात आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी संजय निरुपम यांचं नाव महायुतीकडून चर्चेत होतं. महायुतीसोबत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रवींद्र वायकर आणि संजय निरुपम या दोघांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला होता.

Uddhav Thackeray किर्तीकरांवरही खिचडी घोटाळ्याचे आरोप

ईडीच्या कचाट्यातून मान सोडवून घेण्यासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. आता त्यांना थेट लोकसभेच तिकीट देण्यात आलाय. उद्धव ठाकरेंना आपल्या एकेकाळाच्या जवळच्या सहकाऱ्याविरोधात प्रचार करावा लागणार आहे. त्यांच्यासमोर अमोल किर्तीकरांच आव्हान आहे, ज्यांना ठाकरे गटाने मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिलीय. अमोल किर्तीकरांवरही खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत.

वींद्र वायकर कोण?

2014 मध्ये युतीचं सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांची गृहराज्य मंत्रीपदी वर्णी लागली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना मुख्यमंत्री कार्यालयात चीफ कोऑर्डिनेटर बनवलं होतं. पण त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली नव्हती

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img