26.6 C
New York

Mahakumbhabhishek : शंकराचार्यांच्या उपस्थितीत बुधवारी महाकुंभाभिषेक

Published:

रमेश औताडे/मुंबई

हरिहरपुत्र भजन समाज संचलित ‘शंकरालयम’ मुंबई चेंबूर येथे १ मे रोजी तृतीय जीर्णोद्वार महाकुंभाभिषेक (Mahakumbhabhishek) सोहळा शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंद तीर्थ (Shankaracharya) यांच्या उपस्थितीत आयोजित केला असल्याची माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत शंकरालयमचे अध्यक्ष जयंत लापसिया यांनी दिली.

यंदाचे तिसरे वर्ष

हा महाकुंभाभिषेकम आद्य जगद्‌गुरु बदरी शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंद तीर्थ महा स्वामीगळ श्री क्षेत्र शकटपुरम (कर्नाटक) यांच्या करकमलाद्वारे संपन्न होणार आहे. २००२ आणि २०१४ साली महा-कुंभाभिषेकमाचे शंकरालयम येथे जगदगुरुंच्याच हस्ते आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.

हेही वाचा : दक्षिण मुंबईमधून शिंदे गटाकडून ‘या’ उमेदवाराची घोषणा

कोविडमुळे आणि त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे हा महाकुंभाभिषेक सोहळा लांबला होता. यंदा भारतातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा महाकुंभाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाकुंभाभिषेक सोहळ्याचे धार्मिक विधी अग्रगण्य पुरोहित ब्रम्हश्री लक्ष्मीनारायणा सोमय्याजी आणि त्यांचे सहकारी पार पाडतील तर महाकुंभाभिषेकम पुर्व सोहळ्याचे धार्मिक रामासुब्बू आणि त्यांचे सहकारी पार पडतील.

‘शंकरालया’ हे प्रती शबरीमाला

ज्या भक्त-श्रद्धाळूंना केरळमधील अय्यपाच्या म्हणजेच शबरीमाला सारख्या पवित्र स्थानी जाने शक्य होत नाही त्यांनी ‘शंकरालया’ला भेट देऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात असा सल्ला आद्य श्री शंकराचार्य यांनी दिला आहे, अशी माहिती जयंत लापसिया यांनी दिली.

हेही वाचा : आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img