21 C
New York

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले…

Published:

माळशिरस

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे महाराष्ट्रात झुंजावत सभा सुरू आहे. माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमधून पंतप्रधान मोदी यांनी माळशिरस येथील सभेत काँग्रेस (Congress), शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला.

Narendra Modi तुमची संपत्ती लुटणारं सरकार हवं आहे का?

नरेंद्र मोदी म्हणाले की, तुमची संपत्ती लुटणारं सरकार हवं आहे का? काँग्रेसवाले संधी मिळाल्यास तुमची संपत्ती वाटणार हे तुम्हाला मंजूर आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. काँग्रेसकडून 60 वर्षात जे झालं नाही ते आम्ही करत आहोत असे मोदी म्हणाले.

Narendra Modi त्या नेत्याची इथून लढण्याची हिंमत नाही

नरेंद्र मोदी म्हणाले की, 5 वर्षीपूर्वी एक नेता लढण्यासाठी आला. त्यांनी दुष्कळावर मात करण्याची शपथ घेतली. आता त्यांनी केलेल्या कामाची शिक्षा देण्याची वेळ आले आहे. माढ्याला पाणी देणार असे एका मोठ्या नेत्याने सांगितले होते. मात्र आजही मराठवाडा, विदर्भ पाण्यासाठी वणवण फिरतआहे. त्या नेत्याने आश्वासन देऊनही पाणी दिले नाही. त्या नेत्याने महाराष्ट्रातील लोकांना धोका दिला आहे. पाणी देणार असे सांगून मावळत्या सूर्याची शपख घेतली होती. आश्वासन पूर्ण न केल्याने आज त्या नेत्याची इथून लढण्याची हिंमत होत नाही.

हे ही वाचा;- ठाकरेंच्या ‘या’ निकटवर्तीयाला शिंदे गटाकडून उमेदवारी

काँग्रेसने 60 वर्षात जे केलं नाही ते आम्ही 10 वर्षात केली

नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने 60 वर्षात जे केलं नाही ते आम्ही 10 वर्षात केली आहे. शरिराचा कण कण, जीवनाचा क्षण क्षण देशाला समर्पित केले आहे. जनतेची प्रेम हीच आमची मोठी ताकद आहे. 60 वर्षात जे झालं नाही ते या सेवकाने केले आहे. 25 कोटी लोकांना आम्ही गरिबीतून मुक्त केले आहे. 25 कोटी लोकांना गरीबीतून मुक्त करण्याचे सगळे पुण्य तुम्हला लाभणार आहे. त्या पुण्याचा खरा हकदार मी नाही तर तुम्ही आहे. काँग्रेस गेली 60 वर्षे फक्त गरिबी हटावचा नारा देत बसले. आज 80 कोटी लोकांना मोफत अन्न मिळत आहे. देशात वेगाने विकासकाम सुरू केले आहे.

हे ही वाचा;- वसंत मोरेंचा रोड रोलर धावणार?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img