मुंबई
एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेल्या दक्षिण मुंबईमधून (South Mumbai Loksabha) अखेर महायुतीचा (MahaYuti) उमेदवार ठरला आहे. दक्षिण मुंबई लोकसभा (Loksabha) मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीमधील दक्षिण मुंबई लोकसभेचा तिढा सुटला असून शिवसेना शिंदे गटाला ही जागा स्वतःकडे ठेवण्यात यश आले आहे. दक्षिण मुंबई लोकसभेतून शिवसेना नेत्या यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या लोकसभेत आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव अशी लढत होणार आहे.