रमेश औताडे/मुंबई
“कुणी घर देता का घर” अशी खंत नाटकात आपण पाहत असतो. मात्र घाम गाळून जमा केलेली कष्टाची कमाई जर विकासक गिळंकृत (Housing Fraud) करत असेल तर आम्ही काय करायचे ? पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नाही म्हणून आता आम्ही न्यायालयात जाणार, असा इशारा घराची फसगत झालेल्या ग्राहकांचे प्रमुख निकेश रावल (Nikesh Rawal) आणि अब्बास कुरेशी (abbas Qureshi) यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
Housing Fraud उच्च न्यायालयात जाणार
मुंबई चेंबूर येथे एका विकासकाने बांधकाम केलेल्या इमारतीमध्ये घर खरेदी करणाऱ्या शेकडो ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली आहे. या सर्व ग्राहकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशानंतरही विकासकावर कारवाई झाली नाही. त्यामुळे आता उच्य न्यायालयात जाणार व ग्राहकांना न्याय मिळून देणार असे निकेश रावल आणि अब्बास कुरेशी यांनी सांगितले.
देवेगौडांच्या नातूवर जनता दलाची कारवाई
Housing Fraud फ्लॅट एरिया, फ्लॅट नंबर यांमध्ये तफावत
आमच्या सोबत खरेदीदारांची ही फसवणूक केली आहे ११ फ्लॅट पैकी ०२ फ्लॅट चे रजिस्ट्रेशन करून दिले आणि उर्वरित ०९ फ्लॅट च्या ‘अलॉटमेंट लेटर’ आणि ‘डीड ऑफ कॅन्शलेशन’ यामध्ये फ्लॅट एरिया, फ्लॅट नंबर यांमध्ये तफावत आहे. तसेच अलॉटमेंट लेटर दिल्यानंतर फ्लॅट हे दुसऱ्याच व्यक्तीना रजिस्ट्रेशन करून विक्री केले. त्यामुळे पोलिसांनी व संबंधितांनी या प्रकरणी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी रहिवाश्यांनी यावेळी केली.