मुंबई
मुंबईची सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेस्ट बसचे तिकीट (BEST Fare) दर वाढण्याची शक्यता आहे. किमान तिकीट 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहे. एसी बसचेही तिकीट 10 किलोमीटर मागे 3 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत आता बेस्च बसच्या तिकीट (BEST Ticket New Rate) दरवाढीची भर पडणार आहे. मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने बेस्टला दरवाढीचे निर्देश दिलेत. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्याासाठी हे निर्देश देण्यात आलेत. दिवसाला तब्बल 35 लाख प्रवासी बेस्टमधून (BEST) प्रवास करतात. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या बजेटवर पडण्याची शक्यता आहे.
बेस्ट कडून सध्या किमान तिकीट 5 रुपये आहे. तर एसीचे 6 रुपये आहेत. यामध्ये वाढ करून किमान तिकीट सात रुपये होणार आहे. ऐसी बसचेही ही तिकीट 3 रुपयाने वाढणार आहे. ही दरवाढ लोकसभा निवडणुकीच्या नंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळी नंतर मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
BEST Fare लाखो मुंबईकरांना फटका
बेस्ट बसही मुंबईकरांची सेकंड लाईफलाईन आहे. दररोज लाखो मुंबईकर बेस्ट बसने प्रवास करतात. यामुळे पास दरवाढीचा लाखो मुंबईकरांना फटका बसला आहे. दररोज 35 लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात, त्यामुळे या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. बेस्टचे उत्पन्न आणि महसूल वाढवण्यासाठी आणि प्रवाशांसाठीच्या पास पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याची दरात बदल करण्यात आल्याचं बेस्ट प्रशासनाने सांगितलं आहे. बेस्टच्या नव्या दरांमुळे सुमारे 10 लाख पासधारकांना आर्थिक फटका बसणार आहे.
ठाकरेंच्या ‘या’ निकटवर्तीयाला शिंदे गटाकडून उमेदवारी
BEST Fare पालिकेकडून मदत घेत कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची वेळ
बेस्ट सध्या तोट्यात आहे. बेस्ट प्रशासनाला पालिकेकडून आर्थिक सहाय्य घेत कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची वेळ आली आहे. यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. बेस्टच्या किमान तिकीटाचा दर पाच रुपये केल्यानंतर उत्पन्न वाढवण्यात मदत होईल, अशी बेस्ट प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र, बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 35 लाखांवरून 25 लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट सफल झालं नाही. त्यामुळे आता बेस्ट प्रशासनाने दैनंदिन आणि मासिक पासच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.