5.5 C
New York

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांनी मंगळवार 30 तारखेला डोंबिवलीतील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी डोंबिवलीतील महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काढण्यात आलेल्या रॅलीत नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) टीका केली. जर महराष्ट्राच्या हिताचे बोललो नाही तर मंत्रालयही गुजरातला नेतील, असे ठाकरे म्हणाले.

उमेदवार दरेकर, आदित्य ठाकरे यांसह अनेक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरात गणरायाचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.त्यांनतर इंदिरा चौक, चार रस्ता टिळक पुतळा मार्गे शेलार नाका, घरडा सर्कल पर्यत वाजतगाजत रॅली काढण्यात आली. उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह वरून सरदेसाई, जितेंद्र आव्हाड, सुभाष भोईर, उपनेत्या ज्योती ठाकरे, विजय साळवी, कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, लोकसभा समन्वय संतोष जाधव, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, कॉम्रेड काळू कोमास्कर, कॉंग्रेस नेते संतोष केणे, आम आदमी पार्टी राज्य उपाध्यक्ष अरुण शिंदे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीने साधारण नागरिक हे उमेदवार दिला आहे.उमेदवार वैशाली दरेकर यांचे काम सर्वाना माहित आहेत. आज आमच्या बरोबर जनता पाठिंबा देण्यासाठी आली आहे. पुढे आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका करताना म्हणाले, पक्ष फोडण्याचा परिवार फोडत असल्याचे पाहत आहोत.महाविकास आघाडी हे विकासाचे बोलत आहेत. महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का नेत आहेत? महाराष्ट्राचा २ वर्ष विकास का अडला आहे. कृषीक्षेत्रात आपण मागे का पडला आहोत. जेव्हा ते मागे पडत असताना तेव्हा तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. देशात निवडणूक आयोग आहे कि नाही असा प्रश्नहि ठाकरे यांनी उपस्थित केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, भटकती आत्मा म्हणणाऱ्यांना शरद पवारांचा मृत्यू हवाय का ? त्यांचा जोवर मृत्यू होणार नाही, हे राज्य आपल्या हातात येणार नाही अशी त्यांची भावना होत आहे. अजित पवारहि त्यांची शेवटची सभा कधी होणार हे माहित नाही असे बोलत आहे. ही प्रचाराची पातळी ? वयवृद्ध माणसाला १०० वर्ष जगावे असे म्हणतो. पण भटकती आत्मा असे बोलत आहे, मृत्यू वाट पाहत आहे. मरणाची इच्छा व्यक्त करणे याचे सारखे खालच्या दर्ज्याचे विचार असूच शकत नाही.

उमेदवार दरेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाल्या, अर्ज भरताना जनतेची साथ पाहून ही विजयाची रॅलीच असल्याचे दिसले. या रॅलीत महाविकास आघाडी सहभागी झाली होती. डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. आता आमची निशाणी मशाल घराघरात पोहचणार आहे. आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. हि आता आमची उजळणी आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img