1.6 C
New York

WHO : कोरोनाच्या नव्या दुष्परिणामाचा धोका

Published:

पुणे : कोरोनाच्या (Corona) संकटाविषयी अनभिज्ञ असलेल्या वैद्यकीय क्षेत्राने कोरोनाकाळात रुग्णांवर सर्रास अँटिबायोटिक्सचा (Antibiotics) वापर केला. आवश्यकता नसतानाही जगभरात जवळपास चारपैकी तीन रुग्णांना अँटिबायोटिक्स देण्यात आली. त्यामुळे आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनादेखील (WHO) हवालदिल झाली आहे.

कोरोनाचे अनेक दुष्परिणाम आता समोर येत आहेत. कोरोनावर उपाय म्हणून रुग्णांना रेमडीसीवरसारखे इंजेक्शन देण्यात आले होते. त्याचेही दुष्परिणाम दिसून आले. काही रुग्णांना कार्डियाक अरेस्टचा सामना करावा लागत आहे. तरीही कोरोनामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असा कोणताही निष्कर्ष निघाला नसल्याचे आरोग्य यंत्रणा सांगत आहेत. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने नुकतीच ६५ देशांतील ४ लाख ५० हजार कोरोना रुग्णांच्या आरोग्य अहवालाची तपासणी केली. या रुग्णांना दिलेल्या औषधांचा अभ्यास केला. वास्तवात रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाच्या केवळ ८ टक्के रुग्णांना अँटिबायोटिक्स देण्याची गरज होती. मात्र, प्रत्यक्षात जगभरातील डॉक्टरांनी जवळपास ७५ टक्के रुग्णांना अँटिबायोटिक्स दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरोप, अमेरिकेतील ३३ टक्के रुग्णांना तर मध्य पूर्वेतील आखाती आणि आफ्रिकी देशांमध्ये ८३ टक्के रुग्णांना अँटीबायोटिक्स देण्यात आली. पण, या साथीची नेमकी तीव्रता आणि त्यावरील उपचारांचा अंदाज आल्यानंतर युरोप आणि अमेरिकेत अँटीबायोटिक्सचे प्रमाण हळूहळू कमी करण्यात आले. आफ्रिकेसारख्या अतिमागास भागात मात्र अँटीबायोटिक्सचा वापर वाढतच गेला.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांना म्हणजे जवळपास ८१ टक्के रुग्णांना अँटीबायोटिक्सचा जास्तीचा डोस देण्यात आला होता. मात्र, मध्यम वा सौम्य लागण असलेल्या कोरोना रुग्णांना कमी प्रमाणात अँटीबायोटिक्स देण्यात आली. गंभीर बाब म्हणजे अँटीबायोटिक्सचा वापर करूनही रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी फारसा फायदा झाला नाही. याउलट कोरोनाचा संसर्ग झाला नसलेल्या रुग्णांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम झाल्याचेच दिसून आले.

वास्तविक रुग्णांना अँटीबायोटिक्स देताना अति गरज असेल तरच ती दिली जातात. पण, कोरोना काळात उपचाराची दिशाच स्पष्ट नसल्याने गरज नसतानाही अँटीबायोटिक्स दिली गेली. याचा रुग्णाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन रुगणाच्या शरीरात अँटीबायोटिक्सना प्रतिरोध तयार झाल्याचे आढळून आले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिजैविक प्रतिरोध विभाग प्रमुख डॉ. सिल्व्हिया बर्टानोलियो यांनी म्हटले आहे.

अँटीबायोटिक्स प्रतिरोध म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीला फंगल आणि जीवाणू संसर्ग झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. मात्र अँटीबायोटिक्सचा अतिवापर हा घातकच असतो. त्याचा शरीराला कोणताही फायदा होत नाही उलट शरीरात अँटीबायोटिक्सलाही दाद न देण्याची क्षमता शरीरात निर्माण होते. परिणामी एखाद्याला जिवाणू संसर्ग झाल्यास त्याच्यावर उपचार करणे अवघड जाते. टोकाचा परिणाम म्हणजे यात रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img