पुणे
पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांना आज निवडणूक आयोगाकडून (Election Commission) निवडणूक चिन्ह (Election Symbol) देण्यात आले आहे. वसंत मोरे यांना रोड रोलर (Road Roller) हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून बहाल करण्यात आहे. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
मनसेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरे हे लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदार संघातून उभे राहिले आहेत. वसंत मोरे यांना आज रोड रोलर हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. रोड रोलरच्या माध्यमातून वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. वसंत मोरे यांनी निवडणूक चिन्हाचा फोटो आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे.